Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, 14 महिन्यांचा उच्चांक गाठला, तपासा आजचा रेट

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, 14 महिन्यांचा उच्चांक गाठला, तपासा आजचा रेट

Gold Silver Price : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:00 PM2022-03-04T15:00:45+5:302022-03-04T15:01:59+5:30

Gold Silver Price : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ सुरूच आहे.

gold silver price on record high 4th march gold price in delhi aaj ka sone ka bhav | Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, 14 महिन्यांचा उच्चांक गाठला, तपासा आजचा रेट

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, 14 महिन्यांचा उच्चांक गाठला, तपासा आजचा रेट

नवी दिल्ली : युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर (Russia Ukraine Crisis) जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ सुरूच आहे.

आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. www.ibjarates.com नुसार, शुक्रवारी सकाळी 999 शुद्धतेच्या सोन्याचा भाव किरकोळ वाढून 51689 रुपयांवर पोहोचला. मात्र, सकाळी चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सत्राच्या सुरुवातीला सोने 51638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 68015 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर
जागतिक बाजारातील वाढीमुळे शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने (Gold price today) 14 महिन्यांचा उच्चांक गाठला. MCX वर, दुपारी 1 च्या सुमारास, एप्रिल डिलिव्हरी सोने 51954 रुपये आणि जून डिलिव्हरी सोने 52217 च्या पातळीवर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसह चांदी 68230 च्या पातळीवर व्यवहार करत होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1942 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. त्याचवेळी, चांदीची किंमत 25.26 डॉलरच्या पातळीवर आहे. येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

कशी तपासायची सोन्याची शुद्धता?
- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
- 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिलेले असते.
- 21 कॅरेट सोन्याच्या ओळखीसाठी 875 लिहिलेले असते.
- 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिलेले असते. 
- 14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिलेले असते.

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा किंमत तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 8955664433 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
 

Web Title: gold silver price on record high 4th march gold price in delhi aaj ka sone ka bhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.