Gold Rate: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता सोन्याच्या बाजारावरही दिसून येत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. शुक्रवारी सोन्याचा दर ₹२०० ने घसरून ₹१,५५,९०० प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. गुरुवारीही ₹९०० ची घसरण होऊन दर ₹१,५६,१०० प्रति १० ग्रॅमवर आला होता. एकूण तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत ₹१,४०० प्रति १० ग्रॅमची घट झाली आहे. याच काळात चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. दरम्यान, शनिवार आणि रविवारी दिल्ली सराफा बाजार बंद राहतो.
ब्रँडनिहाय सोन्याचे दर (आजचे दर)
तनिष्क
२२ कॅरेट: ₹१४,१६० प्रति ग्रॅम | ₹१,४१,६०० प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ₹१५,४४७ प्रति ग्रॅम | ₹१,५४,४७० प्रति १० ग्रॅम
कल्याण ज्वेलर्स
२२ कॅरेट: ₹१४,१२० प्रति ग्रॅम | ₹१,४१,२०० प्रति १० ग्रॅम
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स
२२ कॅरेट: ₹१४,१२० प्रति ग्रॅम | ₹१,४१,२०० प्रति १० ग्रॅम
जॉयलुकास
२२ कॅरेट: ₹१४,१२० प्रति ग्रॅम | ₹१,४१,२०० प्रति १० ग्रॅम
सेन्को गोल्ड अँड डायमंड्स
२२ कॅरेट: ₹१४,१३३ प्रति ग्रॅम | ₹१,४१,३३० प्रति १० ग्रॅम
घसरणीमागील कारणे
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चितता आणि मिडल-ईस्टमधील भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू आहेत. गुंतवणूकदारांची सावध भूमिका आणि जागतिक बाजारातील बदल याचाही दरांवर परिणाम होत आहे.
