lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Fuel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलचही 'शतक', इंधन दरवाढ थांबता थांबेना

Fuel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलचही 'शतक', इंधन दरवाढ थांबता थांबेना

कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल ८० डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:29 AM2021-10-07T08:29:00+5:302021-10-07T08:29:50+5:30

कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल ८० डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत.

Fuel Price Hike : After petrol, now diesel will not stop rising for a century, Diesel Rs 99.55/ltr | Fuel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलचही 'शतक', इंधन दरवाढ थांबता थांबेना

Fuel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलचही 'शतक', इंधन दरवाढ थांबता थांबेना

Highlightsगेल्या सलग चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल २.५३ रुपयांनी तर, गेल्या पाच दिवसांत पेट्रोल १.५० रुपयांनी महागले आहे.

मुंबई - पेट्रोलडिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून इंधनाची दरवाढ थांबता थांबेना, असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण, आज पुन्हा एकदा पेट्रोलडिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. या नव्या वाढीसह डिझेल दरवाढीचा आजपर्यंत प्रति लिटरचा सर्वात मोठा आकडा गाठला आहे. डिझेलने एकप्रकारे शतक गाठले असून दिल्लीत आज डिझेलचे दर 99.55 रुपये म्हणजेच 100 रुपये लिटर एवढे झाले आहे. तर, पेट्रोल 109.25 रुपयांवर पोहोचले. 

कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल ८० डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटाच लावला आहे. गेल्या सलग चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल २.५३ रुपयांनी तर, गेल्या पाच दिवसांत पेट्रोल १.५० रुपयांनी महागले आहे. (petrol price hike 25 paise and diesel hike 30 paise know the today latest fuel rate in india)

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढून 103.24 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. तर, डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ होवून 91.77 वर पोहोचले आहेत. इकडे मुंबईत डिझेलने शंभरी गाठल्याचे दिसून येते, आज डिझेलच्या दरात 38 पैशांची वाढ होवून प्रतिलिटर रुपये 99.55 पर्यंत पोहोचले आहे. तर, पेट्रोलच्या दरात 29 पैशांची वाढ होवून ते 109.25 रुपयांवर पोहोचले आहे. 


दरम्यान, युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत.

Web Title: Fuel Price Hike : After petrol, now diesel will not stop rising for a century, Diesel Rs 99.55/ltr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.