lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने परवाना पुन्हा बहाल केला, नेमके काय होते प्रकरण?

McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने परवाना पुन्हा बहाल केला, नेमके काय होते प्रकरण?

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने McDonaldsवर परवाना निलंबनाची कारवाई केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:18 PM2024-02-24T23:18:59+5:302024-02-24T23:20:27+5:30

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने McDonaldsवर परवाना निलंबनाची कारवाई केली होती.

food and drug administration maharashtra resumed mcdonalds ahmednagar license | McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने परवाना पुन्हा बहाल केला, नेमके काय होते प्रकरण?

McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने परवाना पुन्हा बहाल केला, नेमके काय होते प्रकरण?

McDonalds News: बनावट चीज प्रकरणी McDonalds ला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र अन्न औषध प्रशासनाने McDonalds आऊटलेटविरोधात कारवाई करत परवाना रद्द केला होता. मात्र, आता तो पुन्हा बहाल करण्यात आला आहे. 

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने बनावट चीजच्या विरोधात कारवाई केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील McDonaldsच्या दुकानाचा परवाना पूर्ववत केला आहे. एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. एफडीएने कंपनीच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'चीज'च्या गुणवत्तेबाबत कंपनीचा परवाना निलंबित केला होता.

वेस्टलाइफ फूडवर्ल्ड लिमिटेडची उपकंपनी असलेल्या हार्डकॅसल रेस्टॉरंट्सकडे भारताच्या पश्चिम आणि दक्षिणेत मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्स फ्रेंचायझी अधिकार आहेत. मॅकडोनाल्ड्स इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, यासंदर्भात अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत. फ्रँचायझीने नुकताच एक अनुपालन अहवाल दाखल केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, उत्पादनाच्या नावातून चीज हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. यानंतर परवाना पूर्ववत करण्यात आला, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

अहमदनगरचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र बेडे यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, ऑक्टोबर २०२३ मध्ये केडगाव येथील आउटलेटला भेट दिली. तेव्हा असे आढळून आले की, आउटलेटवर प्रदर्शित केलेल्या खाद्यपदार्थांच्या नावांमध्ये अमेरिकन चीज बर्गर, चीज बर्गर, इटालियन यांचा समावेश आहे. चीज लाव्हा बर्गर आणि ब्लूबेरी चीज केक, ही सर्व नावे त्यांच्या उत्पादनांची ब्रँड नावे आहेत. तपासानंतर असे आढळून आले की, उत्पादनांमध्ये शुद्ध चीजऐवजी दुसराच पदार्थ वापरला जात आहे, जो चीजसारखा आहे. तांत्रिकदृष्ट्या, याला चीज ॲनालॉग किंवा चीजला पर्याय असलेला पदार्थ म्हणतात. असा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीकडून खुलासा मागवण्यात आला होता, असे बेडे यांनी सांगितले.

तसेच कंपनीकडून आलेले स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला होता. आपल्या अनुपालन अहवालात अमेरिकन कंपनीने लेबलमध्ये सुधारणा केल्याचे म्हटले आहे. अनुपालन अहवाल प्राप्त झाल्यानंतर परवाना निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीप्रमाणे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे बेडे यांनी सांगितले.
 

Web Title: food and drug administration maharashtra resumed mcdonalds ahmednagar license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.