lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jan Dhan: देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण

Jan Dhan: देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण

देशात सुमारे ६ कोटी जनधन खाती निष्क्रिय असून, या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार होत नाही, अशी माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:35 PM2021-08-11T17:35:31+5:302021-08-11T17:36:52+5:30

देशात सुमारे ६ कोटी जनधन खाती निष्क्रिय असून, या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार होत नाही, अशी माहिती समोर आली आहे.

as per finance ministry over 5 82 crore jan dhan accounts inoperative | Jan Dhan: देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण

Jan Dhan: देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण

नवी दिल्ली: देशभरातील सामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अनेकविध योजनांच्या माध्यमातून सुविधा देत असतात. त्यापैकी महत्त्वाची योजना म्हणजे जनधन खाते. समाजातील सर्व घटकांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी जनधन खाते योजना सुरू करण्यात आली. यामुळे अनेक फायदे सामान्यांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता देशात सुमारे ६ कोटी जनधन खाती निष्क्रिय असून, या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार होत नाही, अशी माहिती समोर आली आहे. (as per finance ministry over 5 82 crore jan dhan accounts inoperative)

केंद्रीय वित्त मंत्रालयाने राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. २८ जुलै २०२१ पर्यंत देशातील सुमारे ५.८२ कोटी जनधन खाती निष्क्रिय आहेत. ज्यात महिलांच्या खात्यांची संख्या सुमारे २.०२ कोटी आहे. देशातील प्रत्येक १० जनधन खात्यांपैकी एक खाते निष्क्रिय झाले आहे. 

अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ

अशा स्थितीत हे आकडे निराशाजनक 

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील प्रत्येक १० जनधन खात्यांपैकी एक खाते निष्क्रिय झाले असून, महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या ३५ टक्के आहे. सरकारने ज्या प्रकारे या योजनेवर काम केले आहे, अशा स्थितीत आकडे निराशाजनक आहेत, असे म्हटले जात आहे. तसेच देशात आतापर्यंत सुमारे ४२.८३ कोटी जन धन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये सुमारे १.४३ लाख कोटी रुपये जमा आहेत. पण त्याचबरोबर निष्क्रिय खात्यांची वाढती संख्या ही देखील सरकारसाठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अशी खाती ज्यात सुमारे दोन वर्षे कोणताही व्यवहार होत नाही, ते निष्क्रिय मानले जाते. तुमचे जनधन खातेदेखील निष्क्रिय झाले असेल, तर काळजी करण्याची गरज आहे. कारण सरकारकडून सबसिडी किंवा अन्य योजनेंतर्गत येणारा पैसा या खात्यात येतो. अशा परिस्थितीत जर तुमचे जनधन खाते निष्क्रिय केले गेले असेल, तर तुम्ही सर्व सरकारी लाभांपासून वंचित राहू शकता, असे सांगितले जाते. 
 

Web Title: as per finance ministry over 5 82 crore jan dhan accounts inoperative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.