lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा

‘महागाईला तेल रोखे जबाबदार’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:18 AM2021-09-08T07:18:15+5:302021-09-08T07:18:50+5:30

‘महागाईला तेल रोखे जबाबदार’

Finance Minister Nirmala Sitharaman's claim turned out to be false | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा

Highlightsसाकेत एस. गोखले यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, सरकारने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ पासून तेल रोख्यांच्या मूळ किमतीचे कोणतेही भुगतान केलेले नाही.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १६ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांवर हल्ला करताना पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या भावाचे मुख्य कारण तेल रोखे (ऑइल बाँडस्) व त्यावरील व्याज मोदी सरकारला द्यावे लागत असल्याचा केलेला दावा माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार खोटा सिद्ध झाला आहे.  

साकेत एस. गोखले यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, सरकारने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ पासून तेल रोख्यांच्या मूळ किमतीचे कोणतेही भुगतान केलेले नाही.
 

विरोधकांची टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षांनी मंत्री निर्मला सीतारामन यांनी तेल रोख्यांबाबत केलेला युक्तिवाद आधीच खोडून काढलेला आहे. काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सीतारामन यांच्या दाव्यावर हल्ला करताना म्हटले की, खोटे बोलण्यासाठी सरकारमध्ये एक व्यक्ती पुरेशी आहे. अर्थमंत्र्यांनी आपली माहिती सुधारून घेतल्यास बरे.

Web Title: Finance Minister Nirmala Sitharaman's claim turned out to be false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.