Lokmat Money > बिझनेस न्यूज > सराफा बाजारात घसरण

सराफा बाजारात घसरण

दागिने निर्मात्यांकडून नसलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सुस्तीमुळे सोमवारी येथील सराफा बाजारात सोने १० ग्रॅममागे १० रुपयांनी खाली

By admin | Published: November 3, 2015 02:24 AM2015-11-03T02:24:30+5:302015-11-03T02:24:30+5:30

दागिने निर्मात्यांकडून नसलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सुस्तीमुळे सोमवारी येथील सराफा बाजारात सोने १० ग्रॅममागे १० रुपयांनी खाली

Falling on the bullion market | सराफा बाजारात घसरण

सराफा बाजारात घसरण

नवी दिल्ली : दागिने निर्मात्यांकडून नसलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सुस्तीमुळे सोमवारी येथील सराफा बाजारात सोने १० ग्रॅममागे १० रुपयांनी खाली
येऊन २६,८१० रुपये झाले. औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणी निर्मात्यांकडून मागणी नसल्यामुळे चांदी किलोमागे २७० रुपयांनी
स्वस्त होऊन ३६,५०० रुपयांवर आली.
बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करण्याचे अंदाज व्यक्त होत असल्यामुळे गुंतवणुकीसाठी म्हणून सोने व चांदीची मागणी कमी झाली व पर्यायाने सोने चार आठवड्यांपूर्वीच्या किमतीवर पोहोचले.

Web Title: Falling on the bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.