Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही

कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही

RBI New Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. पाहा काय आहेत हे नवे नियम.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:16 IST2026-04-22T10:16:08+5:302026-04-22T10:16:08+5:30

RBI New Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. पाहा काय आहेत हे नवे नियम.

Even if the card is changed automatic payments will not stop OTP password will not be required up to rs 15000 check rbi new rules | कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही

कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही

RBI New Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाचं कार्ड पुन्हा जारी म्हणजेच रिइश्यू झालं, तर जुन्या कार्डवर सुरू असलेले ई-मँडेट नवीन कार्डवर आपोआप ट्रान्स्फर केले जाऊ शकतील.

रिझर्व्ह बँकेनं बँकांना असे निर्देश दिलेत की, जेव्हाही ऑटोमॅटिक पेमेंटची सूचना ग्राहकाला पाठवली जाईल, तेव्हा त्यामध्ये तक्रार नोंदवण्याच्या पद्धतीची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. ई-मँडेटशी संबंधित नियमांमधील हे बदल या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कंपन्यांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे करण्यात आले आहेत.

शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण

आरबीआयचे नवीन नियम

  • आरबीआयने डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम प्रसिद्ध केले आहेत.
  • जुन्या कार्डवरील ई-मँडेट आता नवीन कार्डवर आपोआप ट्रान्स्फर होईल.
  • हे बदल तज्ज्ञ आणि कंपन्यांच्या सूचनांनुसार करण्यात आलेत.
  • १५,००० रुपयांपर्यंतच्या ऑटो-पेमेंटसाठी आता ओटीपी किंवा पासवर्डची गरज भासणार नाही.
  • १५,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी ओटीपी व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल.

स्वयंचलित पेमेंटसाठी ओटीपीचे नियम

नवीन अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलंय की, वारंवार होणाऱ्या पेमेंटसाठी (जसं की ओटीटी सबस्क्रिप्शन किंवा वीज बिल) ई-मँडेट सुविधा देण्याच्या बदल्यात ग्राहकांकडून कोणतेही शुल्क किंवा चार्जेस आकारलं जाणार नाही. आरबीआयच्या मते, बँकांना तक्रार निवारणासाठी एक मजबूत यंत्रणा उभारावी लागेल. केंद्रीय बँकेनं सांगितलं की, दरमहा होणाऱ्या १५,००० रुपयांपर्यंतच्या स्वयंचलित पेमेंटसाठी आता वेगळ्या ओटीपी किंवा पासवर्डची (AFA) आवश्यकता नसेल.

परंतु, जर पेमेंट १५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यासाठी ओटीपीसारखी पडताळणी करणं आवश्यक असेल. तसंच, रिझर्व्ह बँकेनं काही ठराविक पेमेंटसाठी ही मर्यादा वाढवली आहे. विमा प्रीमियम, म्युच्युअल फंडाचे हप्ते आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार आता ओटीपीशिवाय करता येतील.

Web Title : RBI ने डिजिटल भुगतान को आसान किया: ऑटो-पे जारी, ₹15,000 तक OTP ज़रूरी नहीं।

Web Summary : RBI ने डिजिटल भुगतान सरल किया। ई-मैंडेट अपने आप नए कार्ड में स्थानांतरित हो जाएंगे। ₹15,000 तक के भुगतान के लिए OTP की आवश्यकता नहीं है। बैंकों के पास शिकायत निवारण तंत्र होना चाहिए। बीमा, म्युचुअल फंड और क्रेडिट कार्ड भुगतान के लिए उच्च सीमा।

Web Title : RBI eases digital payments: Auto-pay continues, OTP not needed for ₹15,000.

Web Summary : RBI simplifies digital payments. E-mandates transfer to new cards automatically. OTP is not needed for payments up to ₹15,000. Banks must have robust grievance mechanisms. Higher limits for insurance, mutual funds and credit card payments.