lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना संकटातही बँकांना नफा झाल्यानं सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना धनलाभ

कोरोना संकटातही बँकांना नफा झाल्यानं सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना धनलाभ

कोरोना महामारीच्या झटक्यातही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी निव्वळ नफा नोंदविला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:09 AM2021-05-22T06:09:10+5:302021-05-22T06:09:52+5:30

कोरोना महामारीच्या झटक्यातही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी निव्वळ नफा नोंदविला आहे.

Even in the Corona crisis, the banks made a profit, which benefited the employees of the government banks | कोरोना संकटातही बँकांना नफा झाल्यानं सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना धनलाभ

कोरोना संकटातही बँकांना नफा झाल्यानं सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना धनलाभ

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना धनलाभ झाला आहे. इंडियन बँक असोसिएशनने नोव्हेंबर २०२० मध्ये केलेल्या वेतन करारात कामगिरीवर आधारित आर्थ‍िक लाभाची तरतूद असल्याने कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहे. 

कोरोना महामारीच्या झटक्यातही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यामुळे नफ्याच्या प्रमाणाच्या तुलनेत काही दिवसांचे वेतन प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे. सेंट्रल बँकेने १५ दिवसांचे वेतन कर्मचाऱ्यांना दिले आहे. बँकेने गेल्या आर्थ‍िक वर्षात २५५७ कोटी रुपयांचा नफा कमाविला आहे. त्यापूर्वी बँकेला सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँक ऑफ महाराष्ट्रनेही चौथ्या तिमाहीत १६५ कोटींचा नफा मिळविला आहे. त्यामुळे बँकेनेही कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात लाभ दिला आहे. 

Web Title: Even in the Corona crisis, the banks made a profit, which benefited the employees of the government banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.