lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डीटीएच ग्राहकांच्या संख्येत २५ टक्के घट; दोन कोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

डीटीएच ग्राहकांच्या संख्येत २५ टक्के घट; दोन कोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

एप्रिल महिन्यापासून लागू झालेल्या ट्रायच्या नवीन नियमावलीमुळे हा फटका बसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:00 AM2019-10-09T01:00:43+5:302019-10-09T01:00:53+5:30

एप्रिल महिन्यापासून लागू झालेल्या ट्रायच्या नवीन नियमावलीमुळे हा फटका बसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

DTH subscribers decline by 5%; Twenty-two million customers turned around | डीटीएच ग्राहकांच्या संख्येत २५ टक्के घट; दोन कोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

डीटीएच ग्राहकांच्या संख्येत २५ टक्के घट; दोन कोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

मुंबई : दूरसंचार नियामक आयोगाच्या नवीन नियमावलीमुळे डीटीएच सेवेचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या दरांमुळे देशातील एप्रिल ते जून या कालावधीत देशभरातील डीटीएच सेवेच्या ग्राहक संख्येत तब्बल २५ टक्क्यांनी म्हणजेच २ कोटीने घट झाली आहे.
दूरसंचार नियामक आयोग म्हणजेच ‘ट्राय’च्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत डीटीएच ग्राहकांची संख्या ५४.२६ दशलक्ष झाली आहे. ही संख्या जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये ७२.४४ दशलक्ष होती. एप्रिल महिन्यापासून लागू झालेल्या ट्रायच्या नवीन नियमावलीमुळे हा फटका बसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. ट्रायच्या नियमावलीमुळे ग्राहकांना वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळेल व केबल, डीटीएचचे दर कमी होतील, असा दावा ट्रायतर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ट्रायच्या नियमावलीचा फटका ग्राहकांनाच बसला व दरामध्ये वाढ झाली. त्यामुळे या ग्राहकांनी डीटीएच सेवा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

ओटीटीचा स्वीकार !
ग्राहकांनी केबल व डीटीएच सेवेला पर्याय म्हणून ओटीटी (ओव्हर द टॉप) सेवांचा स्वीकार केला आहे. देशात ४ जी इंटरनेट कमी दरात मिळू लागल्यापासून सर्वसामान्यांना सुलभपणे इंटरनेटवर आधारित सेवांमुळे दूरचित्र वाहिन्यांचा लाभ घेता येणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे डीटीएच सेवेच्या ग्राहकांत घट होऊन ओटीटी सेवेच्या वापरात वाढ झाल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

Web Title: DTH subscribers decline by 5%; Twenty-two million customers turned around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :DTHडीटीएच