Lokmat Money > बिझनेस न्यूज > DMart ने डिसेंबरच्या तिमाहीत कमावला ५५३ कोटींचा नफा; नोंदवली २४ टक्क्यांची मोठी वाढ

DMart ने डिसेंबरच्या तिमाहीत कमावला ५५३ कोटींचा नफा; नोंदवली २४ टक्क्यांची मोठी वाढ

३१ डिसेंबर २०२१ अखेर देशभरात DMart ची २६३ स्टोअर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 03:30 PM2022-01-09T15:30:18+5:302022-01-09T15:30:51+5:30

३१ डिसेंबर २०२१ अखेर देशभरात DMart ची २६३ स्टोअर आहेत.

dmart quarter 3 net profit up 23 6 percent at rs 552 crore | DMart ने डिसेंबरच्या तिमाहीत कमावला ५५३ कोटींचा नफा; नोंदवली २४ टक्क्यांची मोठी वाढ

DMart ने डिसेंबरच्या तिमाहीत कमावला ५५३ कोटींचा नफा; नोंदवली २४ टक्क्यांची मोठी वाढ

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात अनेक उद्योग बंद पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, असेही काही उद्योग, व्यवसाय होते, ज्यांनी दमदार कामगिरी करत घसघशीत नफा कमावला. दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक राधाकिशन दमानी यांची मालकी असलेल्या डीमार्ट (DMart) कंपनीने डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत तब्बल ५५३ कोटीचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नफ्यात २४ टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका सर्वांना बसला होता. गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत करोना संकटातून सावरत अर्थव्यवस्था बाहेर पडली. टप्याटप्यात निर्बंध हटण्यात आले आणि मॉल खुले करण्यात आले. त्याचा फायदा डीमार्टला झाला असल्याचे दिसून आले. याशिवाय कंपनीला तिसऱ्या तिमाहीत ९२१८ कोटींचा महसूल मिळाला आहे.

सन २०२० मध्ये ४४७ कोटींचा नफा 

डीमार्टला सप्टेंबर ते डिसेंबर २०२० मध्ये ४४७ कोटींचा नफा झाला होता तर ७५४२ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा नफ्यात २४ टक्के आणि महसुलात २२ टक्के वाढ झाली असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. ३१ डिसेंबर २०२१ अखेर देशभरात डीमार्टची २६३ स्टोअर आहेत. जनरल वस्तू आणि तयार कपड्यांची मागणीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
 

Web Title: dmart quarter 3 net profit up 23 6 percent at rs 552 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.