lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > युद्धामुळे हिरे उद्योग संकटात! गुजरातमधील लाखो हिरे कामगारांना रोजीरोटीची चिंता

युद्धामुळे हिरे उद्योग संकटात! गुजरातमधील लाखो हिरे कामगारांना रोजीरोटीची चिंता

गेल्या १०० पेक्षा अधिक दिवस सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे गुजरातच्या हिरे उद्योगाला वाईट दिवस आले आहेत. युद्धामुळे या उद्योगात काम करणाऱ्या लाखो कामगारांची रोजीरोटी धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:40 AM2022-06-13T06:40:35+5:302022-06-13T06:40:54+5:30

गेल्या १०० पेक्षा अधिक दिवस सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे गुजरातच्या हिरे उद्योगाला वाईट दिवस आले आहेत. युद्धामुळे या उद्योगात काम करणाऱ्या लाखो कामगारांची रोजीरोटी धोक्यात

Diamond industry in crisis due to war Millions of diamond workers in Gujarat worry about their livelihood | युद्धामुळे हिरे उद्योग संकटात! गुजरातमधील लाखो हिरे कामगारांना रोजीरोटीची चिंता

युद्धामुळे हिरे उद्योग संकटात! गुजरातमधील लाखो हिरे कामगारांना रोजीरोटीची चिंता

अहमदाबाद :

गेल्या १०० पेक्षा अधिक दिवस सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे गुजरातच्या हिरे उद्योगाला वाईट दिवस आले आहेत. युद्धामुळे या उद्योगात काम करणाऱ्या लाखो कामगारांची रोजीरोटी धोक्यात आली असून, त्यांना कामावरून काढले जात आहे, तर काहींना सुटीवर पाठवले जात आहे. विशेषत: सौराष्ट्र विभागातील ग्रामीण भागात काम करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अहमदाबादमध्ये हिरे उद्योग प्रक्रिया आणि पॉलिशिंगसाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात हिरे आयात करतो. या हिरे उद्योगामुळे १५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे, असे रत्न अँड दागिने निर्यात संवर्धन परिषदेचे प्रादेशिक अध्यक्ष दिनेश नावाडिया यांनी सांगितले.

रशियाकडून लहान आकाराच्या कच्च्या हिऱ्यांचा पुरवठा कमी झाल्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांना आफ्रिकन देशांतून आणि इतर ठिकाणांहून कच्चा माल घ्यावा लागत असून, ज्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून सोने दुकानदारांनी त्यांच्या कामगारांच्या आणि पॉलिशर्सच्या कामाच्या तासांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे.

अमेरिकेने दिला भारताला धोका
० राज्यातील सुरत शहरातील दुकानांमध्ये मोठ्या आकाराच्या हिऱ्यांवर प्रामुख्याने प्रक्रिया केली जाते. 
० भारत ७० टक्के कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे अमेरिकेला निर्यात करतो. त्यात रशियन कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. 
० नावाडिया यांनी सांगितले की, अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांनी त्यांना आधीच ई-मेल पाठवले आहेत की ते रशियन वस्तू खरेदी करणार नाहीत. 
० त्यामुळे सौराष्ट्रातील भावनगर, राजकोट, अमरेली आणि जुनागढ जिल्ह्यांतील हिरे कामगारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 
० याशिवाय राज्याच्या उत्तर भागातील कामगारांनाही याचा फटका बसला आहे.

२७% कच्चे हिरे भारत रशियाकडून आयात करतो
७०% पॉलिश केलेले हिरे भारत अमेरिकेला निर्यात करतो 

व्यापाऱ्यांनी आफ्रिकन देशांकडे हिऱ्यांसाठी वळवली वाट
अमेरिकेने रशियातील हिरे घेण्यास दिला नकार रशियाकडून कच्च्या हिऱ्यांचा पुरवठा कमी झाला.

महाराष्ट्रालाही फटका
दागिन्यांवर प्रक्रिया आणि पॉलिशिंग करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण गुजरात आणि राजस्थान येथे स्थायिक झाले असून, त्यांनाही या संकटाचा मोठा फटका बसला आहे.

‘पटली’ने नेमके जगायचे कसे?
गुजरातमधील हिरे प्रक्रियेत गुंतलेल्या एकूण कामगारांपैकी ५० टक्के कामगार लहान आकाराच्या हिऱ्यांवर काम करतात. ज्यांना स्थानिक भाषेत ‘पटली’ म्हणतात. ते म्हणाले की, युद्धापूर्वी गुजरातमध्ये पॉलिशिंगसाठी आयात करण्यात आलेले ३०% कच्चे हिरे हे अलरोसा 
या रशियन सोने खाण कंपनीकडून आले होते. पॉलिशिंग आणि प्रोसेसिंगसाठी गुजरातमध्ये येणाऱ्या हिऱ्यांपैकी ६० टक्के हिरे रशियातून येतात. यापैकी बहुतेक लहान आकाराचे हिरे आहेत.

५०% गुजरातमधील कामगार लहान आकाराच्या हिऱ्यांवर काम करतात.
६०% हिरे पॉलिशिंगसाठी गुजरातमध्ये रशियातून येतात

 

Web Title: Diamond industry in crisis due to war Millions of diamond workers in Gujarat worry about their livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.