lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:53 AM2020-02-11T09:53:16+5:302020-02-11T09:54:19+5:30

भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे.

Delhi Election Results : Sensex surges 41,300 points during Delhi elections | Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

Highlightsभारतीय शेअर बाजारात उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे.आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्सनं 300 अंकांची उसळी घेतली असून, 41 हजार 300च्या पार पोहोचला आहे.  निफ्टीतही 100 अंकांची तेजी दिसत असून, त्याची वाटचाल 12 हजार 125 अंकांवर सुरू आहे.

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीचा निकाल येण्यास थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे. तत्पूर्वीच भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्सनं 300 अंकांची उसळी घेतली असून, 41 हजार 300च्या पार पोहोचला आहे.  तसेच निफ्टीतही 100 अंकांची तेजी दिसत असून, त्याची वाटचाल 12 हजार 125 अंकांवर सुरू आहे. मुंबई शेअर बाजाराचे सर्वच 30 शेअर्स हिरव्या निशाण्यासह वर आहेत. आयटीसी, टाटा स्‍टील आणि एनटीपीसीच्या शेअर्सनंही उसळी घेतल्याचे दिसत आहेत. तसेच इन्फोसिस, एअरटेल आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये किमान वाढ आहे. लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येणार आहेत. या निकालाच्या कलानुसार भाजपाला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागू शकतो. तसेच आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत.

सोमवारी शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरले होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 162.23 अंकांनी घसरून 40,979.62 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 66.85 अंकांनी घसरून 12,031.50 अंकांवर बंद झाला. वाहन आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांतील विक्रीच्या माºयाचा सर्वाधिक फटका निर्देशांकांना बसला. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, ओएनजीसी आणि हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग घसरले. तसेच सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 10 पैशांनी वाढला. त्याचबरोबर एक डॉलरची किंमत 71.30 रुपये झाली. विदेशी चलन बाजार सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण व अन्य चलनाच्या तुलनेत डॉलरच्या कमजोरीमुळे रुपयाला बळ मिळाले.

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत सोने 52 रुपयांनी वाढून 41,508 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीही 190 रुपयांनी वाढून 47,396 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही तेजीचा कल दिसून आला. सोने वाढून 1,574 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीही वाढून 17.80 डॉलर प्रतिऔंस झाली.

Web Title: Delhi Election Results : Sensex surges 41,300 points during Delhi elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.