lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus News : जगातील सहा कोटी नागरिक होतील गरीब- जागतिक बँक

CoronaVirus News : जगातील सहा कोटी नागरिक होतील गरीब- जागतिक बँक

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने १०० विकसनशील देशांना १६० अब्ज अमेरिकन डॉलरची मदत दिली जाणार असल्याची घोषणाही बॅँकेने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 01:30 AM2020-05-21T01:30:01+5:302020-05-21T01:30:33+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने १०० विकसनशील देशांना १६० अब्ज अमेरिकन डॉलरची मदत दिली जाणार असल्याची घोषणाही बॅँकेने केली आहे.

CoronaVirus News: Six crore citizens of the world will be poor- World Bank | CoronaVirus News : जगातील सहा कोटी नागरिक होतील गरीब- जागतिक बँक

CoronaVirus News : जगातील सहा कोटी नागरिक होतील गरीब- जागतिक बँक

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांवर संकट आले असून, त्यामुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. या महामारीचा परिणाम म्हणून जगभरातील ६ कोटी नागरिक गरीब होण्याची भीती जागतिक बॅँकेने व्यक्त केली आहे. या नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने १०० विकसनशील देशांना १६० अब्ज अमेरिकन डॉलरची मदत दिली जाणार असल्याची घोषणाही बॅँकेने केली आहे.
जागतिक बॅँकेचे अध्यक्ष डेव्हीड मालपॉस यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही भीती वर्तविली आहे. या जागतिक साथीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसत असून, त्यावर तातडीने उपाय योजण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. जागतिक बॅँकेने १०० विकसनशील देशांना १६० अब्ज डॉलरची मदत जाहीर केली असून, येत्या १५ महिन्यांमध्ये ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे ते म्हणाले. गरिबीच्या निर्मूलनासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांवर या साथीने पाणी फिरविले असून, जगभरातील सुमारे ६ कोटी नागरिक आगामी काळामध्ये गरिबीच्या दलदलीमध्ये फसू शकतात. त्यामुळे त्यांना मदत करणे गरजेचे आहे. जागतिक बॅँक यासाठीचे प्रयत्न करीत असून, जगभरातील दानशूरांना अधिक मदत देण्याचे आवाहनही मालपॉस यांनी यावेळी केले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्था वृद्धीच्या मार्गावर परतण्यासाठी आपल्याला मोठी तयारी करावी लागेल, असे मालपॉस यांनी स्पष्ट केले. यासाठी सर्वप्रथम आरोग्य सेवा मजबूत करून गरिबांना मोफत उपचारांची व्यवस्था करण्याची गरज आहे. याशिवाय गरिबांना रोख आणि वस्तूंच्या स्वरूपामध्ये मदत करणे सुरूच ठेवावे लागेल. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी खासगी क्षेत्राला स्थान ठेवावेच लागेल, असेही मालपॉस यांनी स्पष्ट केले. गरीब देशांना करण्यात येत असलेल्या मदतीमुळे त्यांना आरोग्यविषयक साधने खरेदी करणे शक्य होणार असल्याचे मालपॉस यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

आफ्रिकेला बसणार सर्वाधिक फटका
या साथीमुळे बाधित देशांमध्ये सर्वाधिक संख्या ही आफ्रिकेतील देशांची असेल, असे मालपॉस यांनी सांगितले. ज्या १०० देशांना मदत दिली जाणार आहे, त्यामधील ७० टक्के जनता दारिद्र्यरेषेच्या खाली असणार आहे. यामध्ये आफ्रिकेच्या सहारा विभागातील ३९ देश असतील. अफगाणिस्तान, चाड, हैती, नायजेरिया या दहशतवादाने प्रभावित असणाऱ्या देशांमध्येही गरिबांची संख्या वाढण्याची भीतीही त्यांनी वर्तविली.

Web Title: CoronaVirus News: Six crore citizens of the world will be poor- World Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.