lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus: भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर; विकासदर ६० वर्षांतील नीचांकी स्तरावर येण्याचा अंदाज-  IMF

Coronavirus: भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर; विकासदर ६० वर्षांतील नीचांकी स्तरावर येण्याचा अंदाज-  IMF

आयएमएफने 'कोरोना रोगराई आणि आशिया-प्रशांत क्षेत्र' अशा शीषर्काखाली एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:34 PM2020-04-16T17:34:30+5:302020-04-16T17:43:48+5:30

आयएमएफने 'कोरोना रोगराई आणि आशिया-प्रशांत क्षेत्र' अशा शीषर्काखाली एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Coronavirus: asia see zero percent growth in 2020 says imf make a plan for financial help vrd | Coronavirus: भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर; विकासदर ६० वर्षांतील नीचांकी स्तरावर येण्याचा अंदाज-  IMF

Coronavirus: भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर; विकासदर ६० वर्षांतील नीचांकी स्तरावर येण्याचा अंदाज-  IMF

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या महारोगराईमुळे देशात टाळेबंदी असून, अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिमाण होत असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे. आशियाचा यंदाचा आर्थिक विकासदर शून्यावर येऊ शकतो, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नोंदवला आहे. असे झाल्यास ६० वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी ठरणार आहे. आर्थिक हालचालींबाबत अन्य क्षेत्रांच्या तुलनेत आशियाची अर्थव्यवस्था चांगल्या परिस्थितीत आहे. आयएमएफने 'कोरोना रोगराई आणि आशिया-प्रशांत क्षेत्र' अशा शीषर्काखाली एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
आयएमएफ हेड क्रिस्टालिना जॉर्जिया म्हणाल्या, कोरोना संकटातून जात असलेल्या देशांना 1000 अब्ज डॉलरची आर्थिक मदत देण्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तयार आहे. ‘‘२०२०मध्ये आशियाची वाढ  शून्यावर येण्याची शक्यता आहे. आशियातील आर्थिक वाढीचा दर जागतिक संकटाच्यादरम्यान 4.7 टक्के आणि आशियाई वित्तीय संकटांचा कालावधीत 1.3 टक्के होता. शून्यवाढीचा दर हा 60 वर्षांच्या स्थितीतील सर्वात खराब कामगिरीचा परिणाम असेल. पण आशिया क्षेत्राची कामगिरी इतरांच्या तुलनेत चांगली असून, या वर्षाच्या वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये तीन टक्के घट येण्याची शक्यता आहे. 

चीनचा जीडीपी 1.2%वर येण्याची शक्यता
आयएमएफच्या मते, आशियाच्या दोन मोठ्या व्यावसायिक भागीदार असलेल्या अमेरिका आणि युरोपमधील अनुक्रमे: ६ टक्के आणि ६.६ टक्के घट होणार असल्याचा अंदाज आहे. या वर्षाची चीनची आर्थिक विकासदर २०१९च्या ६.१ टक्क्यांनी पडून १.२ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. आयएमएफने सांगितले की, कोरोनामुळे आशियाई उत्पादनात मोठी घसरण दिसून येऊ शकते.  
 

Web Title: Coronavirus: asia see zero percent growth in 2020 says imf make a plan for financial help vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.