lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपन्यांनी ८००० जणांना कामावरून काढून टाकले, मंदीच्या संकेतांमुळे खर्चकपातीची उपाययोजना

कंपन्यांनी ८००० जणांना कामावरून काढून टाकले, मंदीच्या संकेतांमुळे खर्चकपातीची उपाययोजना

२५ मार्च रोजी दूरसंचार उपकरण उत्पादक कंपनी एरिक्सनने स्वीडनमधील १,२०० कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:00 AM2024-03-28T11:00:28+5:302024-03-28T11:00:41+5:30

२५ मार्च रोजी दूरसंचार उपकरण उत्पादक कंपनी एरिक्सनने स्वीडनमधील १,२०० कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला.

Companies cut 8,000 jobs as cost-cutting measures signal a slowdown | कंपन्यांनी ८००० जणांना कामावरून काढून टाकले, मंदीच्या संकेतांमुळे खर्चकपातीची उपाययोजना

कंपन्यांनी ८००० जणांना कामावरून काढून टाकले, मंदीच्या संकेतांमुळे खर्चकपातीची उपाययोजना

नवी दिल्ली : जगातील ५ मोठ्या टेक कंपन्यांनी या महिन्यात तब्बल ८ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. खर्च कपात करण्यासाठी हे कठोर पाऊल कंपन्यांनी उचलले आहे. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांत ॲपल, आयबीएम, डेल आणि एरिक्सन यांचा समावेश आहे. 

२५ मार्च रोजी दूरसंचार उपकरण उत्पादक कंपनी एरिक्सनने स्वीडनमधील १,२०० कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला. कंपनीने गेल्या वर्षीही ८,५०० कर्मचाऱ्यांना काढले होते. ॲपलने एक महागडला संशोधन व विकास (आरअँडडी) प्रकल्प बंद केला. वॉच मॉडेल्ससाठी मायक्रो एलईडी बनविण्याचे संशोधन इथे सुरु होते. या प्रकल्पावर काम करणाऱ्या अनेक अभियंत्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

‘एआय’ मुळे फटका
आयबीएमचे मुख्य संपर्क अधिकारी जोनाथन अदाशेक यांनी १२ मार्च रोजी मार्केटिंग व कम्युनिकेशन विभागातील अर्धेअधिक कर्मचारी काढले आहेत. या लोकांची कामे कृत्रिम बुद्धिमत्तेकडून करून घेण्यात येतील, असे कंपनीने म्हटले होते.

Web Title: Companies cut 8,000 jobs as cost-cutting measures signal a slowdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.