lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वात मोठी करचोरी उघड, बोगस कंपन्या, व्यवहार अन् बिलांद्वारे ८,१०० कोटींचा गंडा

सर्वात मोठी करचोरी उघड, बोगस कंपन्या, व्यवहार अन् बिलांद्वारे ८,१०० कोटींचा गंडा

या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 01:51 PM2023-06-15T13:51:25+5:302023-06-15T13:51:40+5:30

या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत

Biggest tax evasion exposed, Rs 8,100 crore through bogus companies, transactions and bills | सर्वात मोठी करचोरी उघड, बोगस कंपन्या, व्यवहार अन् बिलांद्वारे ८,१०० कोटींचा गंडा

सर्वात मोठी करचोरी उघड, बोगस कंपन्या, व्यवहार अन् बिलांद्वारे ८,१०० कोटींचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क, इंदूर/नवी दिल्ली: बनावट करदाते आणि बोगस कंपन्यांच्या माध्यमातून करचोरीचा देशातील सर्वात मोठा प्रकार समोर आला आला आहे.  गेल्या दोन वर्षांत अशा करदात्यांची ओळख पटवण्यात आली, ज्यांचा या चोरीमध्ये थेट सहभाग आढळून आला आहे. मध्य प्रदेशच्या व्यावसायिक कर विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, विभागाला बनावट कंपन्यांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे तब्बल आठ हजार १०० कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे आढळून आले आहे. आता या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

बोगस जीएसटी नोंदणीविरोधात कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक कर विभाग विशेष मोहीम राबवत आहे. यात बोगस करदात्यांच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. मोहिमेत विहित बाबींच्या आधारे संशयास्पद करदात्यांची ओळख पटवण्यात आली. आता ऑनलाइन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

सर्वाधिक करचोरीची प्रकरणे कुठे?

राज्य    प्रकरणे

  • दिल्ली    १,८८८
  • उत्तर प्रदेश    ८३१ 
  • हरयाणा    ४७१ 
  • तामिळनाडू    २१० 
  • महाराष्ट्र    २०१ 
  • तेलंगणा    १६७ 
  • मध्य प्रदेश    १३९ 

एकूण प्रकरणे    ४,९०९

या प्रकरणांमध्ये २९ हजार कोटींची उलाढाल आणि आठ हजार १०० कोटींची संभाव्य करचोरी समोर येत आहे. - लोकेशकुमार जाटव, आयुक्त वाणिज्य कर

कशी पकडली चोरी?

  • डेटा विश्लेषणादरम्यान, इंदूरच्या एका संशयित व्यावसायिकाकडून बोगस व्यावसायिकांच्या साखळीची माहिती हाती लागली. पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल पत्त्याच्या आधारे त्यांचे डेटा विश्लेषण केले गेले.
  • पहिल्या टप्प्यात ओळखल्या गेलेल्या १४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. या व्यावसायिकांचा कोणताही पत्ता नव्हता. अशा कंपन्यांचे नेटवर्क शोधण्यासाठी डेटा एकत्र केला असता देशभरात ४,९०० हून अधिक व्यावसायिक आणि कंपन्या संशयास्पद आढळल्या.
  • बोगस व्यवहार आणि बनावट बिलांद्वारे जीएसटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा (आयटीसी) अवाजवी फायदा घेऊन करचोरी करण्यात आली. आता या करचोरांना देशभरातून ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे.


ते क्रमांक शोधणार ४,९०९ हून अधिक जीएसटी क्रमांक

देशातील बोगस डीलर्सच्या नेटवर्कमध्ये  सापडले आहेत. यामध्ये दिल्ली, यूपी, हरयाणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा येथील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. 

Web Title: Biggest tax evasion exposed, Rs 8,100 crore through bogus companies, transactions and bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर