lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > झुनझुनवाला यांच्या Akasa Airच्या ताफ्यात २०वं विमान; 'हे' करणारी ठरली आशियातील पहिली एअरलाइन्स

झुनझुनवाला यांच्या Akasa Airच्या ताफ्यात २०वं विमान; 'हे' करणारी ठरली आशियातील पहिली एअरलाइन्स

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअरनं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:56 PM2023-08-01T16:56:43+5:302023-08-01T17:04:27+5:30

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअरनं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

big bull rakesh jhunjhunwala akasa air 20th aircraft in fleet Boeing asia s first airlines | झुनझुनवाला यांच्या Akasa Airच्या ताफ्यात २०वं विमान; 'हे' करणारी ठरली आशियातील पहिली एअरलाइन्स

झुनझुनवाला यांच्या Akasa Airच्या ताफ्यात २०वं विमान; 'हे' करणारी ठरली आशियातील पहिली एअरलाइन्स

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअरनं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अकासा एअरनं आपल्या विमानांच्या ताफ्यात २० व्या विमानाचा समावेश केलाय. यासह ही एअरलाइन आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्यास पात्र ठरली आहे. कंपनीनं मंगळवारी ही माहिती दिली. 7 ऑगस्ट रोजी विमान कंपनी आपल्या ऑपरेशन्सना एक वर्ष पूर्ण करेल.

कंपनीच्या ताफ्यात सामील झालेलं हे विमान बोईंग ७३७ मॅक्स आहे. ही MAX विमानाचं 737-8-200 एडिशन आहे. यासह अकासा एअर हे विमान आपल्या ताफ्यात सामील करून घेणारी आशियातील पहिली एअरलाइन बनली आहे. अकासा एअरमध्ये सामील झालेल्या बोईंग 737-8-200 चा रजिस्ट्रेशन VT YAV आहे. 28 जुलै 2023 रोजी अमेरिकेतील सिएटल येथे अकासा एअरलाईन्सकडे हे विमान सुपुर्द करण्यात आलं. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे विमान बंगळुरूला पोहोचलं. कामकाजाला सुरूवात झाल्यापासून एका वर्षाच्या आत कंपनीच्या ताफ्यात 20 विमानांचा समावेश करण्यात आलाय. यामुळे आता आकासा एअर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीही पात्र झाली आहे.

अत्याधुनिक विमान
बोईंग 737-8-200 विमान पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रगत आहे. हे विमान आपल्या श्रेणीतील सर्वाधिक लेगरूमसाठी ओळखलं जातं. त्यामुळे एअरलाइन ग्राहकांचा अनुभव नेहमीपेक्षा चांगला बनवू शकते. यावर आकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. 20 वं विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा हा ऐतिहासिक क्षण आकासाच्या यशोगाथेतील आंतरराष्ट्रीय अध्यायाची सुरुवात आहे. ही विशेष संधी आपल्याला कंपनीच्या भविष्याबाबत अत्यंत आशावादी बनवत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: big bull rakesh jhunjhunwala akasa air 20th aircraft in fleet Boeing asia s first airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.