lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPO आणण्यापूर्वी ULLU ला मोठा झटका, कॉन्टेंटबाबत सरकारकडे तक्रार; Apple, Google देखील अडचणीत

IPO आणण्यापूर्वी ULLU ला मोठा झटका, कॉन्टेंटबाबत सरकारकडे तक्रार; Apple, Google देखील अडचणीत

आयपीओची तयारी करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म Ullu ला त्याच्या कॉन्टेंटमुळे मोठा झटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:16 PM2024-03-04T14:16:45+5:302024-03-04T14:17:24+5:30

आयपीओची तयारी करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म Ullu ला त्याच्या कॉन्टेंटमुळे मोठा झटका बसला आहे.

Big blow to ULLU ahead of IPO complaint to Govt regarding content Apple Google also in trouble | IPO आणण्यापूर्वी ULLU ला मोठा झटका, कॉन्टेंटबाबत सरकारकडे तक्रार; Apple, Google देखील अडचणीत

IPO आणण्यापूर्वी ULLU ला मोठा झटका, कॉन्टेंटबाबत सरकारकडे तक्रार; Apple, Google देखील अडचणीत

Ullu IPO:  आयपीओची तयारी करत असलेल्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म Ullu ला त्याच्या कॉन्टेंटमुळे मोठा झटका बसला आहे. उल्लू त्याच्या प्लॅटफॉर्मवर अडल्ट मुव्हीज आणि चित्रपट ऑफर करते. आता या कॉन्टेंटमुळे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं (NCPCR) त्याविरोधात तक्रार केली आहे. लहान मुलांच्या अधिकारांशी निगडीत या संस्थेनं, लहान मुलांना अडल्ट कॉन्टेंट सहजरित्य अॅक्सेस करू देणं आणि शालेय मुलांना अडल्ट कॉन्टेंट दाखवण्याविरुद्ध कारवाई करण्यास सांगितलं आहे.
 

१० दिवसांत मागितली माहिती
 

नॅशनल चाइल्ड राइट्स बॉडीनं २७ फेब्रुवारीला इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाला (MeitY) पत्र लिहून गुगल आणि ॲपलवर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय मंत्रालयाला उल्लू किंवा त्यासारखं कोणतंही ॲप अॅक्सेस करण्यासाठी ॲप स्टोअरवर कठोर केवीआय नियम बनवण्याची विनंती करण्यात आली आहे. एनसीपीसीआरनं मंत्रालयाला १० दिवसांत आवश्यक माहितीसह तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितलंय.
 

NCPCR चे चेअरपर्सन प्रियांक कानूनगो यांनी MeitY ला लिहिलंय की, बॉलीवूडच्या बड्या मंडळींनी आयोगाकडे तक्रार पाठवली आहे आणि त्यात Play Store तसंच iOS मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या Ullu ॲपमध्ये अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप केलाय. हे ॲप गुगल आणि ॲप स्टोअरवर सहज उपलब्ध आहे. ते डाउनलोड करण्यासाठी किंवा कॉन्टेंट पाहण्यासाठी केवायसीची आवश्यकता नाही. त्यांनी मंत्रालयाकडून या प्रकारच्या ॲप्सबाबत नियम आणि पॉलिसी सर्टिफिकेशनशी संबंधित माहिती मागवली आहे.
 

आयपीओ ड्राफ्ट दाखल
 

NCPCR ने उल्लू विरुद्ध हे पाऊल तेव्हा उचलंय आहे जेव्हा त्यांनी BSE SME कडे १५० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट दाखल केला आहे. मोठ्या पडद्यासाठी कॉन्टेंट तयार करण्यासाठी आणि नंतर छोट्या पडद्यावर आणण्यासाठी आयपीओमधून ३० कोटी रुपये वापरण्याची उल्लूची योजना आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३१ कोटी रुपयांचे कॉन्टेंट खरेदी केले जे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २६.५ कोटी रुपयांवर होती. या कालावधीत त्यांचा प्रोडक्शनचा खर्च ३.७ कोटी रुपयांवरून ९.५ कोटी रुपयांवर गेला. उल्लूचं सबस्क्रिप्शन २०२० मध्ये वार्षिक १९८ रुपयांवरून आता ४५९ रुपयांवर गेलं आहे. उल्लूचे २० लाखांहून अधिक ग्राहक आहेत.

Web Title: Big blow to ULLU ahead of IPO complaint to Govt regarding content Apple Google also in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.