lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अशनीर ग्रोव्हरच्या अडचणीत वाढ! शेअर्स परत घेण्यासाठी BharatPe ची कायदेशीर कारवाई

अशनीर ग्रोव्हरच्या अडचणीत वाढ! शेअर्स परत घेण्यासाठी BharatPe ची कायदेशीर कारवाई

भारतपे कंपनीने विक्रेत्यांशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:23 PM2022-05-11T12:23:08+5:302022-05-11T12:24:10+5:30

भारतपे कंपनीने विक्रेत्यांशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

bharatpe to take legal action to recover shares from ashneer grover | अशनीर ग्रोव्हरच्या अडचणीत वाढ! शेअर्स परत घेण्यासाठी BharatPe ची कायदेशीर कारवाई

अशनीर ग्रोव्हरच्या अडचणीत वाढ! शेअर्स परत घेण्यासाठी BharatPe ची कायदेशीर कारवाई

नवी दिल्ली: शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणाऱ्या BharatPe च्या अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस अधिक वाढ होताना दिसत आहे. भारत पे कंपनीने अशनीर ग्रोव्हर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यात आता अशनीर ग्रोव्हर यांच्याकडे असलेले कंपनीचे शेअर्स परत मिळण्यासाठी कायदेशीर कारवाईला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. 

‘भारतपे’चे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर  ग्रोव्हर यांच्याकडील समभाग परत मिळवण्यासाठी त्या संबंधाने कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे भारतपे सांगितले. भागधारकांच्या करारानुसार अशनीर यांच्याकडील प्रतिबंधित समभाग परत मिळविण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलली जातील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांची कंपनीने हकालपट्टी

भारतपे कंपनीने मार्च महिन्यात अशनीर ग्रोव्हर यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल कारवाई म्हणून कंपनीच्या सर्व पदांवरून त्यांची उचलबांगडी करताना, त्यांचा ‘सह-संस्थापक’ हा दर्जा हिरावून घेतला. सल्लागार कंपनी पीडब्ल्यूसीने केलेल्या तपासात सादर केलेल्या अहवालाच्या आधारे, अशनीर आणि माधुरी जैन ग्रोव्हर यांच्या काळात कंपनीमध्ये बनावट पावत्या तयार करणे आणि वैयक्तिक कारणासाठी अवाजवी खर्च केल्याचे आरोप करत, कंपनीने त्यांच्यावर कथित आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला होता. भारतपेने केलेल्या चौकशीदरम्यान बनावट पावत्या देणाऱ्या विक्रेत्यांचीही ओळख पटली आहे. विक्रेत्यांना रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे. विक्रेत्यांशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांची कंपनीने हकालपट्टी केली आहे. कंपनीने यावर उपाय म्हणून कर्मचाऱ्यांसाठी नवीन आचारसंहिता लागू केली आहे.

दरम्यान, 'भारतपे'मध्ये सुरू झालेल्या वादानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी तत्काळ प्रभावाने फिनटेक फर्ममधून राजीनामा दिला. आंतरराष्ट्रीय लवादाकडूनही अशनीर ग्रोव्हर यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. 
 

Web Title: bharatpe to take legal action to recover shares from ashneer grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.