lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत गॅसने 'प्युअर फॉर शुअर' सेवा लाँच केली; जाणून घ्या फायदे

भारत गॅसने 'प्युअर फॉर शुअर' सेवा लाँच केली; जाणून घ्या फायदे

भारत गॅस आता गॅस सिलेंडर डिलीव्हरीमध्ये मोठा बदल करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 07:16 PM2024-02-09T19:16:22+5:302024-02-09T19:17:38+5:30

भारत गॅस आता गॅस सिलेंडर डिलीव्हरीमध्ये मोठा बदल करत आहे.

Bharat Gas Launches Pure for Sure Service Know the benefits | भारत गॅसने 'प्युअर फॉर शुअर' सेवा लाँच केली; जाणून घ्या फायदे

भारत गॅसने 'प्युअर फॉर शुअर' सेवा लाँच केली; जाणून घ्या फायदे

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आता आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवी योजना लाँच करणार आहे. या योजनेचे नाव 'प्युअर फॉर शुअर' आहे, याद्वारे ग्राहकांना वेळेत, योग्य वजनाचे सिलेंडर मिळणार आहे. सिलेंडरशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. डिलिव्हरी घेण्यापूर्वी ग्राहक सिलेंडर तपासू शकतील. भारत गॅसने सुरू केलेली ही सेवा देशातील अशा प्रकारची पहिली सेवा आहे. ही सेवा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित IEW 2024 मध्ये सुरू केली.

भारतीय हवाई दलासाठी Mahindra बनवणार लढाऊ विमाने, ब्राझीलच्या कंपनीसोबत करार...

बीपीसीएलने सांगितले की, 'प्युअर फॉर शुअर'च्या मदतीने ग्राहकांना योग्य सिलिंडर मिळू शकतील. या योजनेंतर्गत सिलिंडरवर छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाईल. यात QR कोड असेल. QR कोड स्कॅन केल्यावर, ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह प्युअर फॉर शुअर पॉप अप दिसेल. सिलिंडरचे वजन यासारखे अनेक महत्त्वाची माहिती यात दिसेल. यामुळे ग्राहकांना डिलिव्हरी घेण्यापूर्वीच सिलिंडर तपासता येणार आहे. सिलेंडरमध्ये छेडछाड झाल्यास, QR कोड स्कॅन केला जाणार नाही यामुळे वितरणही होणार नाही.

या सेवेचा ग्राहक आणि एजन्सीलाही फायदा होणार आहे. बीपीसीएलच्या एमडींनी सांगितले की, बीपीसीएलच्या 'प्युअर फॉर शुअर' योजनेमुळे एलपीजी सेवेत मोठा बदल होणार आहे. यामुळे सिलिंडरच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास वाढेल. ट्रान्झिटमध्ये गॅस सिलिंडरची चोरी, डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकांची उपस्थिती आणि रिफिल डिलिव्हरीसाठी वेळेची निवड यासारख्या समस्या सोडवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. प्युअर फॉर शुअर अंतर्गत एआय आधारित रूट ऑप्टिमायझर सेवा देखील उपलब्ध असेल. यामुळे एजन्सीची वितरण क्षमता वाढेल.

कंपनीला डिलिव्हरीमध्ये महिलांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. शिवाय, डिलिव्हरी सूचना, रिअल टाइम ट्रॅकिंग, ओटीपी आधारित डिलिव्हरी आणि पसंतीचे स्लॉट बुकिंग यांसारख्या फिचरसह, प्युअर फॉर शुअर उत्तम सेवेचा अनुभव देणार आहे.

Web Title: Bharat Gas Launches Pure for Sure Service Know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.