lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! गुगल पे वापरकर्त्यांनो 'हे' अ‍ॅप चुकूनही डाऊनलोड करु नका, बँक खातं होईल रिकाम

सावधान! गुगल पे वापरकर्त्यांनो 'हे' अ‍ॅप चुकूनही डाऊनलोड करु नका, बँक खातं होईल रिकाम

देशात डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी मार्केटपासून ते मॉलपर्यंत सगळीकडे डिजिटल व्यवहार सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:52 PM2023-11-23T15:52:37+5:302023-11-23T15:53:07+5:30

देशात डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी मार्केटपासून ते मॉलपर्यंत सगळीकडे डिजिटल व्यवहार सुरू आहेत.

Beware! Google Pay users, don't download this app by mistake, bank account will be empty | सावधान! गुगल पे वापरकर्त्यांनो 'हे' अ‍ॅप चुकूनही डाऊनलोड करु नका, बँक खातं होईल रिकाम

सावधान! गुगल पे वापरकर्त्यांनो 'हे' अ‍ॅप चुकूनही डाऊनलोड करु नका, बँक खातं होईल रिकाम

देशात डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी मार्केटपासून ते मॉलपर्यंत सगळीकडे डिजिटल व्यवहार सुरू आहेत. आपल्या फोनमध्ये फोनमध्ये काही ना काही पेमेंट अ‍ॅप उपलब्ध आहे. या पेमेंट ॲप्समध्ये गुगल पे हे खूप लोकप्रिय अॅप आहे. हे वापरण्यास सोपे आहे आणि ते UPI शी जोडलेले आहे, त्यामुळे थेट तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात आणि त्यातच मिळतात. Google Pay हे स्वतःच खूप चांगले ॲप आहे, पण तुमच्या फोनमध्ये असलेले दुसरे अ‍ॅप तुमचे काम बिघडू शकते. हे स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप आहे.

TATA group: हे आहेत रतन टाटांचे वारस, तिघांच्या खांद्यावर असेल टाटा ग्रुपची जबाबदारी

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपमुळे तुमची फसवणूक होऊ शकते. फसवणूक करणारे या अ‍ॅपचा फायदा घेत तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतात. यासंदर्भात गुगलनेच आपल्या युजर्सना सावध केले आहे. Google ने म्हटले आहे की, जे लोक त्यांचे अ‍ॅप वापरतात त्यांनी कोणतेही थर्ड पार्टी स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप डाउनलोड करणे किंवा वापरणे टाळावे. जर तुम्ही Google Pay अ‍ॅप वापरणार असाल आणि तुमच्या फोनमध्ये कोणतेही स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप असेल, तर आधी ते अ‍ॅप चालू नाही याची खात्री करा. गुगलने म्हटले आहे की, जर ते आवश्यक नसेल तर असे अॅप्स तुमच्या फोनमधून त्वरित काढून टाका.

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक

स्क्रीन शेअरिंग ॲपपद्वारे, कोणताही फसवणूक करणारा तुमच्या फोनवर ताबा मिळवू शकतो. यानंतर, तो फोनवर होणाऱ्या कोणत्याही व्यवहारावर लक्ष ठेवतो. तुम्ही तुमचे बँक खाते किंवा UPI अ‍ॅपमध्ये प्रवेश करता तेव्हा ते लगेच तुमचे पैसे दुसरीकडे कुठेतरी ट्रान्सफर करतात. तुम्ही तुमच्या खात्याचा पिन स्वतः टाकत असल्याने, फसवणूक करणाऱ्याला तुमचा UPI टाकण्यात कोणतीही अडचण येत नाही.

स्क्रीन शेअरींग ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून या स्क्रीन शेअरिंग ॲपप्सचा वापर वाढला आहे. आता हे ॲप सर्वांच्याच लॅपटॉप आणि फोनमध्ये आहे. Screen Share, AnyDesk आणि TeamViewer सारखे स्क्रीन शेअरिंग अॅप्स खूप लोकप्रिय झाले आहे.

Web Title: Beware! Google Pay users, don't download this app by mistake, bank account will be empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.