lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 50 हजारांहून अधिकच्या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्डऐवजी आता वापरता येणार आधार

50 हजारांहून अधिकच्या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्डऐवजी आता वापरता येणार आधार

50 हजारांहून अधिकचे व्यवहार करायचे असल्यास आपल्याला बँकेत पॅन कार्ड नंबर द्यावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 11:05 AM2019-07-07T11:05:12+5:302019-07-07T11:05:21+5:30

50 हजारांहून अधिकचे व्यवहार करायचे असल्यास आपल्याला बँकेत पॅन कार्ड नंबर द्यावा लागतो.

The base that can be used instead of a PAN card for transactions of more than Rs 50,000 | 50 हजारांहून अधिकच्या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्डऐवजी आता वापरता येणार आधार

50 हजारांहून अधिकच्या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्डऐवजी आता वापरता येणार आधार

नवी दिल्लीः 50 हजारांहून अधिकचे व्यवहार करायचे असल्यास आपल्याला बँकेत पॅन कार्ड नंबर द्यावा लागतो. तसेच आपल्या पॅन कार्डची खातरजमा करूनच असे व्यवहार केले जातात. परंतु आता पॅन कार्डऐवजी आधार कार्डच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिकच्या रकमेचे व्यवहार करणं शक्य होणार आहे. महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले, ज्या व्यवहारांसाठी आधी पॅन कार्डचा वापर केला जात होता. त्याऐवजी आता आधार कार्डचाही वापर करता येऊ शकतो. पण आधार कार्डचा वापर करण्याआधी बँका अन् इतर संस्थांना यंत्रणा अद्ययावत करावी लागणार आहे. तसेच करदात्या यापुढे पॅन कार्डऐवजी आधार कार्डच्या माध्यमातून रिटर्न फाइल करता येणार आहे. आज 22 कोटी पॅन कार्ड हे आधारशी जोडलेले आहेत. तर 120 कोटी लोकांकडे आधार आहे. जर कोणाला पॅन कार्ड बनवायचं असल्यास त्यांच्याकडे आधार कार्ड असावं लागतं. आधार कार्ड असल्यावर पॅन कार्ड तयार करता येते. त्यानंतर त्या पॅन कार्डचा उपयोग केला जातो. त्यामुळे आता बँकेचे व्यवहार करताना पॅन कार्डऐवजी आधार कार्डचाही वापर करता येणार आहे. 

काळा पैसा रोखण्यासाठी रोखीचे व्यवहार जसे की, हॉटेल किंवा विदेशी दौऱ्याचे बिल जे 50 हजारांपेक्षा अधिक आहे, त्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य असेल. तसेच 10 लाखांहून अधिकच्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक असेल, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.  

Web Title: The base that can be used instead of a PAN card for transactions of more than Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.