lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डेबिट कार्डशिवाय एटीएममधून काढू शकता पैसे, 'या' बँकेने सुरू केली सेवा 

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून काढू शकता पैसे, 'या' बँकेने सुरू केली सेवा 

बँक ऑफ बडोदाच्या या सेवेचे नाव इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (Interoperable Cardless Cash Withdrawal) आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 03:13 PM2023-06-06T15:13:55+5:302023-06-06T15:14:37+5:30

बँक ऑफ बडोदाच्या या सेवेचे नाव इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (Interoperable Cardless Cash Withdrawal) आहे.

bank of baroda launched facility for cash withdrawals using upi on its atms know how | डेबिट कार्डशिवाय एटीएममधून काढू शकता पैसे, 'या' बँकेने सुरू केली सेवा 

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून काढू शकता पैसे, 'या' बँकेने सुरू केली सेवा 

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने शानदार सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणालाही डेबिट कार्डची गरज भासणार नाही. डेबिट कार्डशिवाय एटीएमच्या स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करून रोख सहज काढता येते. बँक ऑफ बडोदाच्या या सेवेचे नाव इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (Interoperable Cardless Cash Withdrawal) आहे. या सुविधेअंतर्गत कोणताही बँक ग्राहक यूपीआय (UPI) वापरून बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो.

बँक ऑफ बडोदाच्या निवेदनानुसार, यूपीआय एटीएमद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा देणारी ही देशातील पहिली सरकारी बँक आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, आयसीसीडब्ल्यू (ICCW) सुविधेचा लाभ केवळ बँक ग्राहकच नाही तर इतर बँकांचे ग्राहक देखील घेऊ शकतात. जर कोणी BHIM UPI किंवा इतर कोणतेही UPI अॅप्लिकेशन वापरत असेल तर तो देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना डेबिट कार्ड वापरण्याची गरज नसल्याचे बँक ऑफ बडोदाने स्पष्ट केले आहे.

कसा घेऊ शकता लाभ?
- या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये 'यूपीआय कॅश विथड्रॉल'चा ऑप्शन दाबावा लागेल.
- त्यानंतर रक्कम टाकावी लागेल, जी ग्राहकाला काढायची आहे.
- यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल.
- यानंतर ते ICCW वर नोंदणीकृत UPI अॅप वापरून स्कॅन करावे लागेल.
- यानंतर तुमची टाकलेली रक्कम एटीएममधून बाहेर येईल.

दिवसातून दोनदा आणि एकावेळी फक्त 5000 ची सुविधा
बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा यांच्या म्हणण्यानुसार, ICCW सेवा सुरू केल्याने, ग्राहकांकडे डेबिट कार्ड नसतानाही रोख रक्कम काढता येणार आहे. मात्र या सेवेसोबत काही अटीही घालण्यात आल्या आहेत. हांडा यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक या सुविधेचा वापर बँकेच्या एटीएममध्ये दिवसातून दोनदाच करू शकतात. तसेच, एका वेळी फक्त 5000 रुपयांचा व्यवहार करता येतो.

Web Title: bank of baroda launched facility for cash withdrawals using upi on its atms know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.