Full List of Bank Holidays in May 2026: देशात कधी सणांमुळे, कधी निवडणुकांमुळे तर कधी इतर कारणांमुळे बँका बंद असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर मे महिन्यात बँका कधी बंद राहतील हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयद्वारे बँकांच्या दर महिन्याच्या सुट्ट्या निश्चित केल्या जातात. वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुट्ट्या वेगवेगळ्या वेळी असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मे महिन्यात कोणत्या शहरात बँका कधी बंद राहतील. पुढे तुम्ही बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेऊ शकता.
'या' गोल्ड बॉन्डनं केलं मालामाल; ₹१ लाखांचे झाले ₹३.९५ लाख, गुंतवणूकदारांना २९५% चा रिटर्न
मे महिन्यात कोणत्या तारखेला बँका बंद राहतील?
१ मे - बुद्ध पौर्णिमा आणि मे दिन
या दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
९ मे - रवींद्रनाथ टागोर जयंती
या दिवशी पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल.
१६ मे - राज्य दिन
या दिवशी गंगटोक मध्ये बँका बंद राहतील.
२६ मे - काझी नजरुल इस्लाम यांचा वाढदिवस
या दिवशी अगरतळामध्ये बँकांना सुट्टी असेल.
२७ मे - बकरीद (ईद-उल-जुहा)
या दिवशी अगरतळा, अहमदाबाद, आयझॉल, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिलाँग, सिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे बँका बंद राहतील.
२८ मे - बकरी ईद (ईद-उल-जुहा)
या दिवशी बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, जयपूर, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
शनिवार आणि रविवार - या तारखांना बँका बंद राहतील
३ मे, १० मे, १७ मे, २४ मे आणि ३१ मे रोजी रविवारची सुट्टी असेल, त्यामुळे या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील. याशिवाय ९ आणि २३ मे रोजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार निमित्त बँका बंद असतील.
