lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीस जिओ, रिलायन्स रिटेलमध्ये नोकरी; रिलायन्स स्टोअरमधून सहा महिने मोफत पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ व तेल देणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 10:04 AM2023-06-07T10:04:16+5:302023-06-07T10:05:11+5:30

मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीस जिओ, रिलायन्स रिटेलमध्ये नोकरी; रिलायन्स स्टोअरमधून सहा महिने मोफत पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ व तेल देणार.

balasore coromandel accident reliance foundation announces substantial assistance | बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

मुंबई : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांचे परिवार आणि जखमी यांच्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने १० बिंदूंवर आधारित मदत पॅकेजची घोषणा केली आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि चेअरपर्सन नीता अंबानी यांनी एक निवेदन जारी करून या मदतीची घोषणा केली आहे. अपघाताची माहिती मिळताच फाउंडेशनची आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञांची चमू तातडीने घटनास्थळी रवाना झाली. केवळ अपघातग्रस्त आणि त्यांचे नातेवाईकच नव्हे, तर तेथे बचाव कार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी व जेवणाची सोय प्राधान्याने करण्यात आली. आता अपघातग्रस्तांचे आयुष्य सावरण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.  

मदत पॅकेजची वैशिष्ट्ये

- अपघातग्रस्त परिवारांना रिलायन्स स्टोअरमधून पुढील सहा महिने मोफत पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ व तेल देणार.

- जखमींना मोफत औषधी, उपचार.

- मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीस जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये नोकरी.

- अपंग झालेल्यांना व्हीलचेअर, कृत्रिम हात-पाय देणार.

- एकमेव कमावती व्यक्ती गमावलेल्या महिलांना सूक्ष्म वित्त साह्य आणि प्रशिक्षण.

- ग्रामीण भागातील अपघातग्रस्तांना पालनासाठी गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या देणार.

- अपघातातील मृतांच्या परिवारातील एका सदस्यास वर्षभर मोफत मोबाइल जोडणी.
 

Web Title: balasore coromandel accident reliance foundation announces substantial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.