lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > FD Rates Hike : FD वर जबरदस्त रिटर्न देतेय 'ही' NBFC, आजपासून नवीन व्याजदर लागू 

FD Rates Hike : FD वर जबरदस्त रिटर्न देतेय 'ही' NBFC, आजपासून नवीन व्याजदर लागू 

FD Rates Hike : एनबीएफसी बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:59 PM2023-03-04T17:59:42+5:302023-03-04T18:00:48+5:30

FD Rates Hike : एनबीएफसी बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत.

bajaj finance hikes fixed deposit interest rates offering 8.20 interest | FD Rates Hike : FD वर जबरदस्त रिटर्न देतेय 'ही' NBFC, आजपासून नवीन व्याजदर लागू 

FD Rates Hike : FD वर जबरदस्त रिटर्न देतेय 'ही' NBFC, आजपासून नवीन व्याजदर लागू 

महागाईवर नियंत्रित आणण्यासाठी सरकार मे 2022 पासून रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. या वाढीनंतर, सरकारी आणि खाजगी बँकांव्यतिरिक्त, अनेक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) देखील आपल्या मुदत ठेवीवर (FD) व्याज दरांवर ग्राहकांना चांगला परतावा देत आहेत. अलीकडेच, एनबीएफसी बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत.

बदलानंतर, बजाज फायनान्स मुदत ठेवीवर जास्तीत जास्त 8.20 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. कंपनी 15 ते 23 महिन्यांची विशेष मुदत ठेव योजना चालवत आहे, ज्यावर  8.20 टक्के व्याज देत आहे. कंपनीचे नवीन एफडी दर 4 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. इतर कॅटगरीच्या मुदत ठेवीमध्ये सर्वाधिक 7.85 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय, बजाज फायनान्स 33 महिन्यांची विशेष मुदत ठेव ऑफर करत आहे. 

या विशेष मुदत ठवीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज मिळत आहे तर सामान्य लोकांना मुदत ठेवीवर जास्तीत जास्त 7.70 टक्के व्याज मिळत आहे. तसेच, बजाज फायनान्स कंपनी 15 महिने, 18 महिने, 22 महिने, 30 महिने, 33 महिने आणि 44 महिन्यांच्या विशेष मुदत ठेवी ऑफर करत आहे. 12 ते 23 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 7.50 पर्यंत व्याज देत आहे. सामान्य लोकांना 15 महिन्यांच्या विशेष मुदत ठेवीवर 7.15 टक्के व्याज मिळत आहे.

दरम्यान, अलीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँक, जन स्मॉल फायनान्स बँक इत्यादींनी देखील आपल्या मुदत ठेवीवरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या रेपो दरात वाढ झाल्यानंतर मुदत ठेवीवरील व्याजदर वाढण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: bajaj finance hikes fixed deposit interest rates offering 8.20 interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.