lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...

खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...

Axis Bank revises fixed deposit interest rates : अ‍ॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:46 PM2021-03-22T14:46:17+5:302021-03-22T14:49:00+5:30

Axis Bank revises fixed deposit interest rates : अ‍ॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे.

Axis Bank revises fixed deposit interest rates. check FD rates here | खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...

खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...

Highlightsअ‍ॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या विविध कालावधीसाठी एफडी (FD) ऑफर करते.

खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याज दरात बदल केले आहेत. नवीन दर 18 मार्च 2021 पासून लागू झाले आहे. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या विविध कालावधीसाठी एफडी (FD) ऑफर करते. (Axis Bank revises fixed deposit interest rates. check FD rates here)

या नवीन बदलानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच, 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3 टक्के व्याजदर आणि 3 महिने ते 6 महिन्यात मॅच्युअर होण्याऱ्या एफडीवर 3.5 टक्के व्याज आहे.

सहा महिने ते 11 महिन्यात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज अ‍ॅक्सिस बँक देत आहे. तर 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष 5 दिवसांच्या एफडीवरील व्याज दर 5.15 टक्के आणि 1 वर्ष 5 दिवसापासून 18 महिन्यांपेक्षा कमी एफडीचा व्याज दर 5.10 टक्के आहे. 

याचबरोबर, अ‍ॅक्सिस बँक 18 महिने ते 2 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 5.25 टक्के व्याज देत आहे. अ‍ॅक्सिस बँक 2 वर्ष ते 5 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 5.40% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.75% व्याज ऑफर करत आहे.

(BOI च्या ग्राहकांना अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणार 'ही' सेवा, वाचा बँकेनं काय म्हटलंय?)

अ‍ॅक्सिस बँकेचे लेटेस्ट एफडी व्याज दर...
- 7 दिवस ते 14 दिवस – 2.50%
-  15 दिवस ते 29 दिवस – 2.50%
-  30 दिवस ते 45 दिवस – 3%
-  46 दिवस ते 60 दिवस – 3%
- 61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी – 3%
- 3 महिने ते 4 महिन्यांपेक्षा कमी – 3.5%
-  4 महिने ते 5 महिन्यांपेक्षा – 3.5% कमी
- 5 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी – 3.5%
- 6 महिने ते 7 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
- 7 महिने ते 8 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
- 8 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
- 9 महिने ते 10 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
- 10 महिने ते 11 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
- 11 महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी – 4.40%
- 11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.15%
- 1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा कमी – 5.15%
- 1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवसांपेक्षा कमी – 5.10%
- 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांपेक्षा कमी – 5.10%
-1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
- 13 महिने ते 14 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
-14 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
- 15 महिने ते 16 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
- 16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
- 17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
- 18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.25%
-2 वर्षे ते 30 महिन्यांपेक्षा कमी – 5.40%
-30 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.40%
- 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.40%
- 5 वर्ष ते 10 वर्ष – 5.75%

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे एफडी दर
अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) ज्येष्ठ नागरिकांना निवडक मॅच्युरिटीवर जास्त व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर 2.5 ते 6.5 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळेल.

(गुंतवणूकदारांना कमाई करण्याची मोठी संधी, लवकरच Zomato कंपनी आणणार IPO; वाचा सविस्तर)

दरम्यान, यावर्षी जानेवारीमध्ये अ‍ॅक्सिस बँकेने 15 डिसेंबर 2020 किंवा त्यानंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बुक केलेल्या नवीन किरकोळ मुदत ठेवी मुदतीपूर्वी बंद केल्याबद्दलाच दंड न आकारण्याची घोषणा केली. रिटेल ग्राहकांना लिक्विडिटीच्या अचानक गरजांची चिंता न करता दीर्घकालीन बचतीसाठी प्रोत्साहित करणे हा त्याचा हेतू आहे. ही सवलत नवीन एफडी (FD) आणि आरडीमध्ये (RD) उपलब्ध असणार आहे.
 

Web Title: Axis Bank revises fixed deposit interest rates. check FD rates here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.