lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनला अजून एक धक्का, मोठी कंपनी आपला प्लॅन्ट भारतात हलवणार, १० हजार जणांना मिळणार रोजगार

चीनला अजून एक धक्का, मोठी कंपनी आपला प्लॅन्ट भारतात हलवणार, १० हजार जणांना मिळणार रोजगार

जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपले प्लॅन्ट चीनमधून बाहेर काढून इतर देशात हलवण्यास सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:36 AM2020-05-20T11:36:34+5:302020-05-20T13:08:00+5:30

जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपले प्लॅन्ट चीनमधून बाहेर काढून इतर देशात हलवण्यास सुरुवात केली आहे.

Another blow to China, a large German company will move its plant to India bkp | चीनला अजून एक धक्का, मोठी कंपनी आपला प्लॅन्ट भारतात हलवणार, १० हजार जणांना मिळणार रोजगार

चीनला अजून एक धक्का, मोठी कंपनी आपला प्लॅन्ट भारतात हलवणार, १० हजार जणांना मिळणार रोजगार

Highlightsफुटवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या वॉन वेल्क्सने चीनमधील आपले उत्पादन केंद्र भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.वॉन वेल्क्स ही फुटवेअर कंपनी जगातील ८० हून अधिक देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात करते. कंपनीकडून पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

लखनौ - जागतिक महामारी बनलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत संशयास्पद भूमिका घेणाऱ्या चीनबाबत अनेक देश आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपले प्लॅन्ट चीनमधून बाहेर काढून इतर देशात हलवण्यास सुरुवात केली आहे. आता फुटवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या वॉन वेल्क्सने चीनमधील आपले उत्पादन केंद्र भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

वॉन वेल्क्स ही फुटवेअर कंपनी जगातील ८० हून अधिक देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात करते. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कंपनीने चीनमधील आपले उत्पादन केंद्र भारतात हलवण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही कंपनी आपला प्लॅन्ट उत्तर प्रदेशमधील आग्रा येथेल उभारणार आहे. यासाठी कंपनीकडून पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येथील प्लॅन्टमधून दरवर्षी चपलांच्या ३० लाख जोड्यांचे उत्पादन होणार असून, त्यामुळे दहा हजार जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

भारतात उत्पादन करण्याच्या योजनेतील पहिल्या टप्प्यात ही कंपनी जर्मनीमधील आग्रा येथे प्लॅन्ट उभारेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एनसिलरी युनिट उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. तिथून कंपनीला आवश्यक तो कच्चा माल उपलब्ध होईल. एनसिलरी युनिटमध्ये या कंपनीसाठी आवश्यक सोल, स्पेशल फॅब्रिक आणि केमिकल बनवण्यात येईल. सध्या या वस्तूंचे भारतात उत्पादन होत नाही.

संबंधित बातम्या

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण

म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण... 

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांवर, पण देशवासियांसाठी ही आहे दिलासादायक खबर  

उत्तर प्रदेशमध्ये स्वस्त आणि कुशल कामगारांची असेली उपलब्दता आणि चप्पल उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या उपलब्धतेमुळे या कंपनीने चीन सोडून उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतीही येथे गुंतवणूक करण्यामागचे प्रमुख कारण आहे. त्याबरोबरच आग्रा हे चप्पल उत्पादनामधील भारतातील एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे कंपनीने आपला प्लॅन्ट आग्रा येथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.   

Web Title: Another blow to China, a large German company will move its plant to India bkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.