lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अलर्ट! तुम्हालाही आला का मेसेज? बँक खाते होईल रिकामे

अलर्ट! तुम्हालाही आला का मेसेज? बँक खाते होईल रिकामे

बँक खाते होईल रिकामे, चुकूनही करू नका क्लिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:33 AM2022-05-25T07:33:57+5:302022-05-25T07:34:28+5:30

बँक खाते होईल रिकामे, चुकूनही करू नका क्लिक

Alert! Did you get the message too? Bank account will be empty | अलर्ट! तुम्हालाही आला का मेसेज? बँक खाते होईल रिकामे

अलर्ट! तुम्हालाही आला का मेसेज? बँक खाते होईल रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : हॅकिंगची प्रकरणे सध्या शिगेला पोहोचली असून गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. एसबीआयच्या नावाने बनावट एसएमएस सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आता प्रेस इन्फॉर्फेशन ब्युरो (पीआयबी) या सरकारी एजन्सीने खातेधारकांना सतर्क केले आहे. 

‘प्रिय ग्राहक, तुमच्या कागदपत्रांची मुदत संपली असून, एसबीआय खाते ब्लॉक होईल. अकाउंट सुरू करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा’, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. एसबीआय खातेधारकांनी अशा एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा मेसेज आल्यास त्वरित डिलिट करावा, असे आवाहन बँकेकडून आणि पीआयबीकडूनही करण्यात आले आहे. असा मेसेज किंवा ई-मेल बँकेकडून कोणत्याही खातेदाराला पाठवला नसल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

वैयक्तिक आणि बँकिंग माहिती 
विचारणाऱ्या कोणत्याही बनावट एसएमएस/ई-मेलला प्रतिसाद देऊ नका व जर तुम्हाला असे मेसेज आले तर लगेच report.phishing@sbi.co.in वर मेल करून कळवा, असे आवाहन केले आहे. 

n १९३० या सायबर 
क्राइम हेल्पलाइनवर खातेधारक फोन करूनही माहिती देऊ शकतात. 
n अशा मेसेजमुळे तुमचा डेटा लिक होण्याची शक्यता असते. 
n सायबर भामटे तुमचा डेटा चोरून त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.


 

Web Title: Alert! Did you get the message too? Bank account will be empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.