lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel नं लाँच केला भारताचा पहिला इंटिग्रेटेड ओम्नी-चॅनल क्लाऊड प्लॅटफॉर्म, पाहा काय आहे खास

Airtel नं लाँच केला भारताचा पहिला इंटिग्रेटेड ओम्नी-चॅनल क्लाऊड प्लॅटफॉर्म, पाहा काय आहे खास

आता कंपनीनं एअरटेल सीसीएएएस म्हणजेच कॉन्टॅक्ट सेंटर अॅज अ सर्व्हिस सेवा लाँच केलीये. पाहा काय आहे यात खास.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:21 AM2023-10-19T11:21:47+5:302023-10-19T11:22:16+5:30

आता कंपनीनं एअरटेल सीसीएएएस म्हणजेच कॉन्टॅक्ट सेंटर अॅज अ सर्व्हिस सेवा लाँच केलीये. पाहा काय आहे यात खास.

Airtel Launches India s First Integrated Omni Channel Cloud Platform See What s Special know details | Airtel नं लाँच केला भारताचा पहिला इंटिग्रेटेड ओम्नी-चॅनल क्लाऊड प्लॅटफॉर्म, पाहा काय आहे खास

Airtel नं लाँच केला भारताचा पहिला इंटिग्रेटेड ओम्नी-चॅनल क्लाऊड प्लॅटफॉर्म, पाहा काय आहे खास

देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी भारतीएअरटेल ग्राहकांसाठी सातत्यानं नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. परंतु आता कंपनीनं एअरटेल सीसीएएएस म्हणजेच कॉन्टॅक्ट सेंटर अॅज अ सर्व्हिस सेवा लाँच केलीये. हे या क्षेत्रातील पहिलं इंटिग्रेटेड ओम्नी चॅनल क्लाऊड प्लॅटफॉर्म आहे, जे कोणत्याही एन्टरप्राईजसाठी कॉन्टॅक्ट सेंटरच्या सर्व सोल्युशनला इंटिग्रेटेड एक्सपिरिअन्स देतं.

संपर्क केंद्राच्या गरजेशी संबंधित सर्व व्यवसायांना अनेक विक्रेत्यांकडून वेगवेगळे वॉईस, क्लाउड आणि सॉफ्टवेअर मिळवावं लागतं. यासाठी जास्त प्रमाणात पैसेही खर्च होतो आणि खूप वेळ लागतो. एअरटेलच्या नव्या सुविधेमुळे पैसाही वाचण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आलाय.

व्यवस्थापनासाठी मदत
हे प्लॅटफॉर्म व्हॉइस अॅज अ सर्विस (VaaS), क्लाउड आणि जेनेसिस यासह आघाडीच्या प्रोव्हायडर्सकडून मिळणारं सॉफ्टवेअर इंटिग्रेट करते. या प्लॅटफॉर्ममुळे कंपन्यांना परवडणाऱ्या मासिक किमतीत कॉन्टॅक्ट सेंटर सोल्यूशन्स मिळू शकतील. नवीन CCaaS ऑफरमध्ये परवडणाऱ्या दरात कॉन्टॅक्ट सेंटर सोल्यूशन व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी सर्वोत्तम व्हॉइस क्लाउड आणि सॉफ्टवेअर सेवांचा समावेश आहे.

मॉनिटरिंग होणार सोपं
एअरटेल CCaaS सह, कंपन्या आता इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल अतिशह सहजरित्या, तसंच अखंडपणे हाताळू शकतात. कॉल डायव्हर्ट केले जाऊ शकतात, क्यूमध्ये ठेवले जाऊ शकतात, कॉन्फरन्स कॉलही केले जाऊ शकतात. कॉल रीडायरेक्ट केले जाऊ  शकतात आणि क्लाउड मॉनिटरिंग क्लाउडवर केलं जाऊ शकतं. दरम्यान, हे प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस कोणत्याही ठिकाणाहून सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात.

Web Title: Airtel Launches India s First Integrated Omni Channel Cloud Platform See What s Special know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.