Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ

हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ

Gautam Adani Group : गौतम अदानींना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांनंतर झालेले अब्जावधींचं नुकसान अदानी समूहानं भरून काढलं आहे. पाहा काय आहे समूहातील कंपन्यांची स्थिती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 02:41 PM2024-05-25T14:41:55+5:302024-05-25T14:42:30+5:30

Gautam Adani Group : गौतम अदानींना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांनंतर झालेले अब्जावधींचं नुकसान अदानी समूहानं भरून काढलं आहे. पाहा काय आहे समूहातील कंपन्यांची स्थिती.

Adani s adani enterprises company emerges from Hindenburg shock from loss to profit Increase in shares | हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ

हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ

गौतम अदानींना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांनंतर झालेले अब्जावधींचं नुकसान अदानी समूहानं भरून काढलं आहे. गौतम अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्सनं २०२३ च्या सुरुवातीला शॉर्टसेलर अहवालानंतर झालेला सर्व तोटा भरून काढला. शुक्रवारी कंपनीचा शेअर ३३८४ रुपयांवर बंद झाला.
 

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने जानेवारी २०२३ मध्ये समूहावर कॉर्पोरेट गैरव्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये ३० अब्ज डॉलर्सची घसरण झाली. याला सामोरं जाण्यासाठी समूहाला अनेक मोठी पावले उचलावी लागली. अदानी समूहानं कर्जात मोठी कपात केली आणि महत्त्वाचे प्रकल्प मिळवले आणि गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा उंचावला. अदानी समूहानं मात्र हिंडेनबर्ग यांचे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.
 

३ पट वाढले शेअर्स
 

फेब्रुवारी २०२३ मधील घसरणीनंतर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास तिप्पट झाले आहेत. याशिवाय अदानी समूहाने सिमेंट आणि तांब्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना पुढे नेत असताना जागतिक गुंतवणूकदारांकडून नवीन कर्ज उभे करण्यासाठी अदानी समूहातील इतर कंपन्याही सहभागी होत आहेत. दरम्यान, अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी यया क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani s adani enterprises company emerges from Hindenburg shock from loss to profit Increase in shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.