lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar Card : मस्तच! आधार कार्डशी संबंधित प्रत्येक समस्या फक्त एका कॉलने होणार ठीक; 'या' नंबरवर करा फोन

Aadhaar Card : मस्तच! आधार कार्डशी संबंधित प्रत्येक समस्या फक्त एका कॉलने होणार ठीक; 'या' नंबरवर करा फोन

Aadhaar Card : आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या असतात. ज्यासाठी तुम्ही आता एक नंबर डायल करू शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 03:14 PM2021-10-30T15:14:05+5:302021-10-30T15:32:42+5:30

Aadhaar Card : आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या असतात. ज्यासाठी तुम्ही आता एक नंबर डायल करू शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता.

aadhaar card update now solve your aadhaar related issue on 1947 toll free helpline number | Aadhaar Card : मस्तच! आधार कार्डशी संबंधित प्रत्येक समस्या फक्त एका कॉलने होणार ठीक; 'या' नंबरवर करा फोन

Aadhaar Card : मस्तच! आधार कार्डशी संबंधित प्रत्येक समस्या फक्त एका कॉलने होणार ठीक; 'या' नंबरवर करा फोन

नवी दिल्ली - आधार कार्डशी (Aadhaar Card) संबंधित जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता फक्त एक नंबर डायल करून त्याचे निराकरण करता येणार आहे. आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या असतात. ज्यासाठी तुम्ही आता 1947 नंबर डायल करू शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता. UIDAI ने ट्विट करून या क्रमांकाची माहिती दिली आहे. 12 प्रादेशिक भाषांमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध असेल. आधार हेल्पलाईन 1947 हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. 

#Dial1947ForAadhaar वर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता. हा क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असतो. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिनिधी उपलब्ध असतात.

PVC आधार कसे तयार कराल?

- नवीन आधार PVC कार्डसाठी, तुम्ही UIDAI वेबसाईटर जा.

- My Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा. 

-  तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) टाकावा लागेल.

- तुम्ही सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा आणि OTP साठी Send OTP वर क्लिक करा.

- यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाका.

- तुमच्याकडे आधार पीव्हीसी कार्डचा Preview दाखवला जाईल.

- यानंतर तुम्ही खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा.

- तुम्ही पेमेंट पेजवर जाल, येथे तुम्हाला 50 रुपये शुल्क जमा करावे लागेल.

- पेमेंट पूर्ण केल्यानंतर, तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: aadhaar card update now solve your aadhaar related issue on 1947 toll free helpline number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.