lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थसंकल्पाच्या काही तास आधी घडला चमत्कार; दणक्यात वाढली अंबानी-अदानींची सपत्ती, झाले आणखी मालामाल

अर्थसंकल्पाच्या काही तास आधी घडला चमत्कार; दणक्यात वाढली अंबानी-अदानींची सपत्ती, झाले आणखी मालामाल

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,  जगातील टॉप 20 अब्जाधिशांमध्ये केवळ अंबानी आणि अदानी यांच्याच संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:20 PM2024-02-01T12:20:28+5:302024-02-01T12:21:13+5:30

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,  जगातील टॉप 20 अब्जाधिशांमध्ये केवळ अंबानी आणि अदानी यांच्याच संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

A miracle happened before the budget; Ambani-Adani's wealth increased in a bang | अर्थसंकल्पाच्या काही तास आधी घडला चमत्कार; दणक्यात वाढली अंबानी-अदानींची सपत्ती, झाले आणखी मालामाल

अर्थसंकल्पाच्या काही तास आधी घडला चमत्कार; दणक्यात वाढली अंबानी-अदानींची सपत्ती, झाले आणखी मालामाल

अर्थसंकल्पापूर्वीच आशियातील सर्वात श्रीमंतर उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, या दोहोंच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र याच वेळी, जगातील 10 टॉप अब्जाधिशांच्या संपत्तीत मोठी घसरण दिसून आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मायक्रोसॉफ्ट फाउंडर्सच्या संपत्तीत ज्वाइंटली 16 अब्ज डॉलरहून अधिकची घसरण दिसून आली आहे. यातच, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,  जगातील टॉप 20 अब्जाधिशांमध्ये केवळ अंबानी आणि अदानी यांच्याच संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

अंबानींच्या संपत्तीत वाढ - 
आशियातील सर्वात श्रमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत टॉप 20 अब्जाधिशांपैकी सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे अंबानींच्या संपत्तीत 1.42 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 12 हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता त्यांची एकूण संपत्ती 106 बिलियन डॉलर झाली आहे. या वर्षात मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 9.91 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी सध्या जगातील 11वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

अदानी यांच्या संपत्तीतही मोठी वाढ - 
अंबानींबरोबरच अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, 825 मिलियन डॉलर्स म्हणजेच 6800 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती 95.9 अब्ज डॉलर झाली आहे. टॉप 20 अब्जाधीशांमध्ये ते दुसरे असे अब्जाधीश आहेत, ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सध्या अदानी जगातील 14 व्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योगपती आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 11.6 अब्ज डॉलर एवढी वाढ झाली आहे.

जगातील टॉप 10 अब्जाधिशांच्या संपत्तीत घसरण -
महत्वाचे मणजे, जगातील टॉप 10 अब्जाधिशांच्या संपत्तीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे. सर्वाधिक घसरण मायक्रोसॉफ्टचे फाउंडर लॅरी पेज यांच्या एकूण संपत्तीत 8.81 बिलियन डॉलर आणि सर्जी ब्रिन यांच्या एकूण संपत्तीत 8.28 बिलियन डॉलर एवढी घसरण दिसून आली आहे. जेफ बेजोस, स्टीव्ह बॉल्मर, मार्क झुकरबर्ग आणि एलन मस्क, यांच्या संपत्तीत 3 बिलियन डॉलरची घसरण दिसून आली आहे. लॅरी एलिसन आणि बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 2 बिलियन डॉलर हून अधिकची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
 

Web Title: A miracle happened before the budget; Ambani-Adani's wealth increased in a bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.