lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरुन काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी; ७० टक्के कंपन्या 'वर्क फ्रॉम होम'च्या विरोधात!

घरुन काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी; ७० टक्के कंपन्या 'वर्क फ्रॉम होम'च्या विरोधात!

कोरोना व्हायरसमुळे ऑफीसमधून काम करण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आणि 'वर्क फ्रॉम होम'च्या संस्कृतीचा उदय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 06:13 PM2021-03-18T18:13:40+5:302021-03-18T18:14:23+5:30

कोरोना व्हायरसमुळे ऑफीसमधून काम करण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आणि 'वर्क फ्रॉम होम'च्या संस्कृतीचा उदय झाला.

70 percent companies are not in favor for work from home | घरुन काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी; ७० टक्के कंपन्या 'वर्क फ्रॉम होम'च्या विरोधात!

घरुन काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी; ७० टक्के कंपन्या 'वर्क फ्रॉम होम'च्या विरोधात!

कोरोना व्हायरसमुळे ऑफीसमधून काम करण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आणि 'वर्क फ्रॉम होम'च्या संस्कृतीचा उदय झाला. पण 'वर्क फ्रॉम होम'साठी भारतातील कंपन्या विरोधात असल्याचा एक अहवाल समोर आला आहे. जॉब साइट इनडीडच्या सर्वेक्षणानुसार ६७ टक्के मोठ्या आणि ७० टक्के मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्या कोरोना महामारीनंतर 'वर्क फ्रॉम होम'साठी अनुत्सुक असल्याचं समोर आलं आहे. 

इतकंच नव्हे, तर डिजिटल स्टार्टअप कंपन्यांनी देखील ऑफीस कल्चरच्या बाजूनं असल्याचे संकेत दिले आहेत. तब्बल ९० टक्के कंपन्या कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा ऑफीस कल्चर सुरू करण्याच्या बाजूनं आहेत. महामारीनंतर वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विरोधात असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.

५० टक्के कर्मचारी देखील 'ऑफीस कल्चर'साठी तयार 
"वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी दुरावले गेल्यानं कंपन्यांना आपल्या कामाच्या पद्धतीत पुन्हा एकदा बदल करणं भाग पडलं आहे. कर्मचाऱ्यांच्या उत्पादकता अनुकूल ठेवण्यासाठी ऑफीस कल्चर प्रेरणादायी ठरतं. यात ५० टक्के कर्मचारी देखील कामासाठी आपलं मूळ शहर सोडून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी तयार असल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं आहे", असं 'इनडीड इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार म्हणाले. 
 

Web Title: 70 percent companies are not in favor for work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.