lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबब... देशात ४.८ लाख कोटींची ४.८ लाख घरे बांधकामाविना!, २०१४ नंतर बसला फटका

अबब... देशात ४.८ लाख कोटींची ४.८ लाख घरे बांधकामाविना!, २०१४ नंतर बसला फटका

देशातील बांधकाम क्षेत्राला वाढत्या महागाईचा मोठा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:51 AM2022-06-13T06:51:05+5:302022-06-13T06:51:25+5:30

देशातील बांधकाम क्षेत्राला वाढत्या महागाईचा मोठा फटका बसला आहे.

4 8 lakh crore 4 8 lakh houses in the country without construction | अबब... देशात ४.८ लाख कोटींची ४.८ लाख घरे बांधकामाविना!, २०१४ नंतर बसला फटका

अबब... देशात ४.८ लाख कोटींची ४.८ लाख घरे बांधकामाविना!, २०१४ नंतर बसला फटका

देशातील बांधकाम क्षेत्राला वाढत्या महागाईचा मोठा फटका बसला आहे. सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याने प्रमुख सात शहरांमध्ये ४.८ लाख कोटी रुपयांच्या तब्बल ४.८ लाख घरांचे बांधकाम रखडले आहे किंवा खूप उशिरा सुरू आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ ३७ हजार घरे बांधून पूर्ण करण्यात बांधकाम व्यावसायिकांना यश आले आहे.

२०१४ नंतर बसला फटका
० मालमत्ता सल्लागार कंपनी ॲनारॉकने एका संशोधन अहवालात हा दावा केला आहे. 
० यानुसार, रखडलेल्या घरांपैकी सुमारे २.४ लाख एकट्या दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत. 
० २०१४ मध्ये किंवा त्यापूर्वी बांधकाम सुरू केलेल्या देशातील सात शहरांत दिल्ली-एनसीआर, मुंबई एमएमआर विभाग, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथील प्रकल्पांचा समावेश ॲनारॉकने आपल्या संशोधनात केला आहे.

५.१७ लाख घरांची कामे सुरू
संशोधनातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ ते मे २०२२ दरम्यान या सात शहरांमध्ये ३६,८३० घरे बांधून पूर्ण झाली. 
मे २०२२ अखेरीस या सात शहरांमध्ये ४,४८,१२९ कोटी रुपयांच्या ४,७९,९४० घरांचे बांधकाम लटकले आहे.

विकासक सरसावले
रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक मोठे विकासक पुढे येत आहेत. याशिवाय, सरकारने उभारलेल्या परवडणाऱ्या आणि मध्यम-उत्पन्न गटातील घरांसाठी विशेष सुविधेसह प्रलंबित बांधकामेही पूर्ण केली जात आहेत. यासाठी ‘स्वामी’ निधी आणि एनबीसीसी पुढे येत आहेत.

२०२१ च्या अखेरीस या ७ शहरांत ४.८४ लाख कोटी रुपयांची ५.१७ लाख घरे तयार करण्याचे काम सुरू आहे.

कुठे किती लटकले प्रकल्प? 
७७% दिल्ली-एनसीआर
९% पुणे
५% कोलकाता
३% बंगळुरू
४% चेन्नई
३% हैदराबाद

बांधकाम व्यावसायिक त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून, रेडी-टू-मूव्ह-इन घरांच्या मागणीचा फायदा घेत आहेत. गेल्या पाच महिन्यांत खर्चात वाढ झाल्यामुळे अनेक प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. असे असतानाही विकासक आपली कामाची गती कायम ठेवत आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षांत घरांच्या मागणीतही वाढ झाली आहे.
 - प्रशांत ठाकूर, वरिष्ठ संचालक आणि संशोधन प्रमुख, ॲनारॉक 

Web Title: 4 8 lakh crore 4 8 lakh houses in the country without construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.