lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 25 कोटी खातेदारांना SBIच्या 'या' निर्णयाचा होणार फायदा

25 कोटी खातेदारांना SBIच्या 'या' निर्णयाचा होणार फायदा

खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 02:38 PM2018-03-13T14:38:35+5:302018-03-13T14:38:46+5:30

खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.

25 crore account holders will benefit from SBI's 'this' decision | 25 कोटी खातेदारांना SBIच्या 'या' निर्णयाचा होणार फायदा

25 कोटी खातेदारांना SBIच्या 'या' निर्णयाचा होणार फायदा

नवी दिल्ली :  स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं असेल आणि त्यातील रक्कम 'मिनिमम बॅलन्स'च्या खाली गेली तर आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी फक्त 15 रुपयेच दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल 2018 पासून सुरू होईल. त्यामुळे देशभरातील तब्बल 25 कोटी खातेदारांना याचा फायदा होणार आहे.  

आमच्या ग्राहकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे बँक रिटेल आणि डिजिटल बॅंकिंगचे एमडी पीके गुप्ता म्हणाले. 

मेट्रो आणि शहरी परीसरातील खातेदारांना मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 50 रूपयांवरून  15 रूपये दंड केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज 40 रुपयांहून 12 रूपये करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज 40 रूपये नाही तर 10 रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल. 

Web Title: 25 crore account holders will benefit from SBI's 'this' decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.