lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॅन कार्डबाबत ही चूक केलेली नाही ना?; भरावा लागेल 10 हजारांचा दंड

पॅन कार्डबाबत ही चूक केलेली नाही ना?; भरावा लागेल 10 हजारांचा दंड

पॅन कार्ड हे व्यवहारात महत्त्वाचं असतं. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:59 PM2020-02-11T15:59:02+5:302020-02-11T16:03:51+5:30

पॅन कार्ड हे व्यवहारात महत्त्वाचं असतं. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे.

latest have two pan cards holding more than one pan card you will end up losing 10000 rupees | पॅन कार्डबाबत ही चूक केलेली नाही ना?; भरावा लागेल 10 हजारांचा दंड

पॅन कार्डबाबत ही चूक केलेली नाही ना?; भरावा लागेल 10 हजारांचा दंड

Highlightsपॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्याची तारीख वाढवून दिल्यानंतरही 17 कोटी असे आहेत, ज्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अद्याप लिंक केलेलं नाही. दोन जण किंवा दोन कंपन्यांचे पॅन नंबर एकसारखे असू शकत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे

नवी दिल्लीः पॅन कार्ड हे व्यवहारात महत्त्वाचं असतं. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे. प्राप्तिकर विभागानं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून दिली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्याची तारीख वाढवून दिल्यानंतरही 17 कोटी असे आहेत, ज्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अद्याप लिंक केलेलं नाही. पॅन कार्डला युनिक नंबर असतो.

दोन जण किंवा दोन कंपन्यांचे पॅन नंबर एकसारखे असू शकत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण जर कोणाकडे दोन पॅन कार्ड सापडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. काही जणांकडे अशा प्रकारे दोन पॅन कार्ड असले तरी ते कसे सरेंडर करायचे हे त्यांना माहीत नसतं. कोणत्याही कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडण्याऐवजी लवकरात लवकर दुसऱ्या पॅनकार्डपासून मुक्तता मिळवणं फायदेशीर असतं. त्यासाठी आम्ही यासंबंधीची सर्व माहिती देणार आहोत. 

लागू शकतो 10 हजार रुपयांचा दंड- जर कोणाकडेही अतिरिक्त पॅन कार्ड असल्यास प्राप्तिकर कायदा 1961अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  


अशातच काय करावं लागणार-
एकाच व्यक्तीकडे एकाहून अधिक पॅन कार्ड असल्यास दुसरं सरेंडर करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येतो. यासाठी एनएसडीएलची वेबसाइट किंवा ऑफिसला जाऊन Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Dataवर क्लिक करावं लागणार आहे. या फॉर्मला भरल्यानंतर तो जमा करावा लागणार आहे. 
>> या फॉर्ममध्ये जे पॅन कार्ड जारी ठेवायचं आहे, त्याचा उल्लेख सर्वात वर करावा, उर्वरित फॉर्मचा आयटम नंबर 11मध्ये भरावा. त्याशिवाय ज्या पॅन कार्डला रद्द करायचं आहे, त्याची कॉपी फॉर्मबरोबर लावावी लागणार आहे. 
>>काही लोक वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे पॅन कार्ड तयार करतात. डीमॅट खात्यासाठी वेगळा पॅन आणि इन्कम टॅक्सचं पेमेंट आणि रिटर्नसाठी वेगळं पॅन कार्ड तयार करतात. 
>>तसेच काही जण जुनं पॅन कार्ड हरवल्यानंतर नवं पॅन कार्ड तयार करतात. त्यामुळेही काही जणांकडे अनेक पॅन कार्ड असतात. 
>>डीमॅट खात्यासाठी आणि इन्कम टॅक्सचं पेमेंटसाठी वेगवेगळे पॅन दिलेले असल्यास एक पॅन कार्ड सरेंडर करावं लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी एकच पॅन नंबर द्यावा लागणार आहे. दुसरा पॅन कार्ड सरेंडर करून आपल्या आधीच्या पॅन कार्डची माहिती पाठवून द्यावी. 

Web Title: latest have two pan cards holding more than one pan card you will end up losing 10000 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.