india post office recruitment 2020 rajasthan postal circle gds jobs appost in kashmir post office mp gramin dak sevak | ना मुलाखतीची झंझट, ना परीक्षेचं टेन्शन; पोस्टात दहावी पास असलेल्यांना थेट नोकरी, 6538 पदे भरणार 

ना मुलाखतीची झंझट, ना परीक्षेचं टेन्शन; पोस्टात दहावी पास असलेल्यांना थेट नोकरी, 6538 पदे भरणार 

नवी दिल्लीः देशावर कोरोनाचं संकट असल्यानं लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांची गतीही मंदावलेली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे. सीआरपीएफ किंवा सेबीसारख्या शाखांमध्येही नोकरीची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिसही हजारो पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरत आहे. भारतीय पोस्ट ऑफिसत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसमधील या भरतीअंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण 6538 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तीन राज्यांच्या पोस्ट ऑफिसमधील नोकरीशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घेऊया.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या राज्यांत किती जागा रिक्त 

मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या -  2,834
राजस्थान पोस्टल सर्कल मधील पदांची संख्या - 3,262
जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या - 442
ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण पदांची संख्या - 6,538

भारतीय डाक विभागाच्या मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) 2,834 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2020 आहे. राजस्थान पोस्टल सर्कलमधील जीडीएसच्या 3,262 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2020 आहे. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवकांच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वय श्रेणी
ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा नियमानुसार शिथिल केली जाईल.

निवड कशी होईल?
मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्जानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

पोस्ट ऑफिसमधील या भरतीअंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण 6538 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा

टाटांची TCS मंदीतही देतेय नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ४० हजार तरुणांना रोजगार देणार

हिमाचलच्या पर्वतांमधून 'या' राज्यांत येतंय मोठं संकट, वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: india post office recruitment 2020 rajasthan postal circle gds jobs appost in kashmir post office mp gramin dak sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.