lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mutual Funds: म्युच्युअल फंडातील 'रिस्क' कशी मॅनेज करायची?

Mutual Funds: म्युच्युअल फंडातील 'रिस्क' कशी मॅनेज करायची?

तुमचं गुंतवणूक ध्येय आणि गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न्स यामध्ये रिस्क हा मुद्दा येतो. प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे हे कळल्यावरच गुंतवणूक करायची असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:49 PM2024-03-26T17:49:45+5:302024-03-26T17:51:06+5:30

तुमचं गुंतवणूक ध्येय आणि गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न्स यामध्ये रिस्क हा मुद्दा येतो. प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे हे कळल्यावरच गुंतवणूक करायची असते.

How to manage risk in mutual funds | Mutual Funds: म्युच्युअल फंडातील 'रिस्क' कशी मॅनेज करायची?

Mutual Funds: म्युच्युअल फंडातील 'रिस्क' कशी मॅनेज करायची?

व्यावसायिक दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांचे पैसे ‘तज्ञ टीम’ तर्फे मॅनेज केले जाणे हे म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य आहे. इक्विटी बाजारांमधील पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे हे काम म्युच्युअल फंड करतात हेच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध होण्याचे कारण आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंडात रिस्क असतेच हे विसरून चालणार नाही.

असा कोणताही गुंतवणूक पर्याय नाही की ज्यामध्ये कोणतीच जोखीम नाही पण म्हणून म्युच्युअल फंडापासून दूर राहायचं का ? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. रिस्क आहे म्हणून दूर पळण्यापेक्षा रिस्क समजून घेऊन आपला पोर्टफोलिओ मॅनेज कसा करता येईल याचा विचार आपण करायला हवा. आपली रिस्क घेण्याची क्षमता ओळखणे आणि प्रत्येक फंड योजनेमध्ये रिस्क कशी आणि किती असते याचा अभ्यास करून आपला पोर्टफोलिओ सांभाळणे ही म्युच्युअल फंडातील रिस्क मॅनेजमेंटची पहिली पायरी आहे.

तुम्ही गुंतवणूक करता ती एका निश्चित गोल किंवा ध्येय साध्य करण्यासाठी. तुमचं गुंतवणूक ध्येय आणि गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न्स यामध्ये रिस्क हा मुद्दा येतो. प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे हे कळल्यावरच गुंतवणूक करायची असते. तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्हाला कोणत्या स्कीम मध्ये गुंतवणूक करायची आहे याचा अंदाज येण्यासाठी दोन साधने उपलब्ध आहेत रिस्को मिटर आणि रिस्क प्रोफाईलर या लेखातून तुमच्या गुंतवणुकीसाठी या दोघांचा कसा उपयोग करून घेता येईल हे समजून घेऊया.

रिस्को मिटर (Riskometer)

रिस्को मिटर (Riskometer) -  सेबी म्हणजेच सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी रिस्क नेमकी किती आहे हे समजावण्यासाठी तयार केलेले साधन आहे रिस्को मिटर. एखाद्या म्युच्युअल फंडातील योजना नेमकी किती रिस्की आहे हे दाखवणारे घड्याळच असते असं समजूया लो म्हणजेच सगळ्यात कमी जोखीम आणि आणि व्हेरी हाय म्हणजे सगळ्यात जास्त जोखीम असा रिस्को मिटरचा काटा आपल्याला दिसतो.

1. लो ( Low )-  या प्रकारच्या फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला गुंतवणुकीवर रिटर्न कमी मिळतात पण त्यांची फंडातील गुंतवणूक सर्वात कमी जोखमीची असते. ज्यांना शक्यतो रिस्क टाळायचीच आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हे फंड चांगले असतात.

2. मॉडरेटली लो (Moderately low) - म्हणजेच या गटातील फंड योजना जोखीम घेतात पण तुमच्या पोर्टफोलिओला धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीची गुंतवणूक केली गेलेली असते. सावध गुंतवणूकदारांसाठी ही योजना सोयीची आहे.

3. मॉडरेट (Moderate) - या प्रकारातील फंड जोखीम घ्यायची क्षमता आहे पण घाईघाईने पैसे वाढतील अशी अपेक्षा नाही अशा गुंतवणूकदारांसाठी आहे. म्हणजे ज्यांना जोखीम घेण्यात रस आहे आणि हळूहळू पोर्टफोलिओ वाढवून लॉन्ग टर्म मध्ये पैसे जमतील अशी त्यांची इच्छा आहे.

4. मॉडरेटली हाय (Moderately high) -  या श्रेणीतील म्युच्युअल फंड जोखीम घेऊनच आपला पोर्टफोलिओ ठरवतात. म्हणजेच थेट शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक ही 50% पेक्षा जास्त असते. प्रत्येक फंड योजनेनुसार हे प्रमाण बदलते. त्यामुळे तुम्हाला ‘अग्रेसिव्ह’ गुंतवणूक करायची असेल तर या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. तीन वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक करण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या सगळ्यांसाठी या योजना चांगल्या आहेत.

5. हाय (High) -  यामध्ये बाजारातील चढउतारांचे पोर्टफोलिओ मध्ये प्रतिबिंब उमटणार आहे हे मान्य करूनच गुंतवणूक केली जाते. थेट शेअर्समध्ये संपूर्ण पोर्टफोलिओ गुंतलेला असल्यामुळे जोखीमही जास्त असते. पाच वर्षापेक्षा जास्त सलगपणे गुंतवणूक करू शकणार असला तरच या योजनांचा विचार करा. 

6. व्हेरी हाय (Very High) - इतर सर्व फंड योजनांपेक्षा या योजनांमध्ये जोखीम सर्वात जास्त असते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या या म्युच्युअल फंड योजनांमध्ये लॉन्ग टर्म मध्ये संपत्ती निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे जोखीमही जास्तच असते. ज्यांना शेअर बाजारातील धोक्यांची पूर्ण कल्पना आहे, सवय आहे अशांनीच या योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुयोग्य आहे. या प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांमध्ये सेक्टर फंड, विशिष्ट थीम असलेले फंड, इंटरनॅशनल इक्विटी फंड, मिडकॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड यांचा समावेश होतो.

वरील नेमक्या कोणत्या श्रेणीमध्ये तुम्ही आहात? यावरून तुम्ही कोणता फंड निवडावा हे तुम्हाला लगेच समजेल.

रिस्क प्रोफाईलर (Risk Profiler)

रिस्को मिटर मध्ये गुंतवणूकदारांची रिस्क लक्षात घेऊन कोणता फंड चांगला हे सुचवले जाते, याउलट रिस्क प्रोफाईलर मध्ये प्रत्येक गुंतवणूकदाराची गरज, क्षमता, रिस्क घेण्याची इच्छा याचा अभ्यास करून प्रत्येक गुंतवणूकदाराची किती रिस्क घेता येईल ही पातळीच जणू ठरवली जाते.

रिस्क प्रोफाईल ठरवताना गुंतवणुकीचे उद्दिष्ट कालावधीसाठी करायची आहे, किती गुंतवणूक करायची आहे ?  गुंतवणूक करणाऱ्याची आर्थिक स्थिती याचा अंदाज घेतला जातो. प्रत्येक गुंतवणूकदाराला रिस्क आणि रिटर्न याविषयी वेगवेगळे प्रश्नच विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं किती स्पष्टपणे दिली जातात यावरून ‘सावध (conservative) आणि धाडसी(aggressive)’ या श्रेणीमध्ये गुंतवणूकदारांना रेटिंग दिले जाते. 

रिस्क प्रोफाईल करणे, समजून घेणे सोपे आहे. स्वतःच स्वतःचे रिस्क प्रोफाइलिंग करून घेतले तर आपली गुंतवणूक ध्येय ठरवण्यासाठी ते फायदेशीर ठरेल.

आपल्या ‘रिस्क प्रोफाईल’ला सुयोग्य असेल असाच फंड निवडावा.

रिस्कोमिटर आणि रिस्क प्रोफाईलर यांच्या सहाय्याने गुंतवणूकदारांनी आपली रिस्क घेण्याची क्षमता समजून घेतली की पुढची पातळी ठरते ती म्हणजे या दोघांचा विचार करून आपला पोर्टफोलिओ बनवायची.

रिस्क प्रोफाइल मॅच करा - आपण गुंतवणूक करत असलेला म्युच्युअल फंडाचा योजनेचा प्रकार त्याची रिस्कोमिटरवरची रेटिंग आणि त्या आपली रिस्क घेण्याची क्षमता जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत आपली गुंतवणूक योग्य होणार नाही. उदाहरणार्थ काँझर्वेटिव्ह म्हणजेच सावध गुंतवणूक करण्याची इच्छा असलेला गुंतवणूकदारांनी रिस्कोमिटरवर ‘लो रिस्क’ असलेला फंड निवडायचा आहे, पण जर तुम्ही धाडसी गुंतवणूकदार असाल तर तुम्ही रिस्कोमिटर वरील ‘हाय रिस्क’ असलेला फंड सुद्धा निवडू शकता. रिस्कोमेटर दर महिन्याला बदलतो हे विसरू नका.

पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा - प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक सगळ्यात जास्त रिटर्न देणारी असावी असे वाटते पण त्याच वेळी फंड योजनांमधील रिस्क सुद्धा कमी करायची असते. अशावेळी एकाच प्रकारच्या फंड योजनांमध्ये पोर्टफोलीतील सगळी गुंतवणूक असणे धोकादायक असते. त्यासाठी इक्विटी डेट आणि हायब्रीड अशा तिन्ही प्रकारच्या फंड योजनांचा समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा. यामध्ये रिस्क आणि रिटर्न इक्विटी मध्ये सर्वाधिक तर डेट मध्ये सर्वात कमी असतात. दोघांचे एकत्र फायदे देणाऱ्या योजना असतात. त्यात गुंतवणूक करा.

पोर्टफोलिओचा आढावा घ्या - आपण गुंतवणूक केलेल्या फंडामध्ये आपल्याला अपेक्षित रिटर्न मिळत आहेत ना ? हे तपासून पाहणे आपली जबाबदारी आहे हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. जर आपल्या पोर्टफोलिओतून अपेक्षित रिटर्न मिळत नसतील तर पोर्टफोलिओ बदलणे, म्हणजेच त्यातील फंड बदलणे आवश्यक आहे.

लक्षात ठेवा जोखीम आणि गुंतवणूक यांच्यातील ते सख्या भावाचे आहे. त्यामुळे आपल्याला चांगले रिटर्न कमवायचे असतील तर आपली गरज आणि फंडाचा प्रकार यांचे गणित जुळून मगच गुंतवणूक करा.

गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना साक्षर करणे आणि त्यांचे प्रबोधन करणे यासाठी ॲक्सिस म्युच्युअल फंडातर्फे हा उपक्रम राबवण्यात येतो. 
गुंतवणूकदाराला वन टाइम केवायसी प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट आणि ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.
www.axismf.com / customerservice@axismf.com  www.sebi.gov.in – Intermediaries/ Market Infrastructure Institutions section.
1800 221 322 / customerservice@axismf.com / SEBI Scores portal  http://scores.gov.in.  

रिस्क प्रोफाईलर तुमच्या पोर्टफोलिओशी संबंधित रिस्क समजून घेण्याचे एक साधन आहे. गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक विषयक निर्णयांना स्वतः जबाबदार असतील. त्यांनी गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा. 

म्युच्युअल फंड गुंतवणुका बाजार जोखमीच्या अधीन आहेत. योजनेशी संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

Web Title: How to manage risk in mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.