Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स

Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स

Gold Price Updates: इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहे. पाहा काय आहे सोन्याचा नवीन दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:19 IST2025-06-13T13:17:05+5:302025-06-13T13:19:18+5:30

Gold Price Updates: इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहे. पाहा काय आहे सोन्याचा नवीन दर.

gold price 13 june 2025 crosses rs 1 lakh mark prices increase due to Israel Iran conflict air india plane crash | Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स

Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स

Gold Price Updates: इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहे. एमसीएक्समध्ये सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांच्या पातळी ओलांडली आहे. एमसीएक्स गोल्ड ९९५०० रुपयांच्या पातळीवर उघडलं. काही काळानंतर, सोन्याचा दर १.१२ टक्के किंवा ११०८ रुपयांच्या वाढीनंतर १००२८८ रुपयांच्या पातळीवर पोहोचलं. यापूर्वी एमसीएक्समध्ये सोनं ९८,३९२ रुपयांवर बंद झालं होतं.

एमसीएक्स (MCX Silver Price) चांदीचा दर ५६५ रुपये किंवा ०.५३ टक्के वाढीनंतर १०६४५० रुपये प्रति किलोवर विकला जात आहे. यापूर्वी हा दर १,०५,८८५ रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ५ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. आज सोन्याचा दर सुमारे ३४२५ डॉलर्स होता.

अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 

बुलियन मार्केटमध्येही तेजी

IBJA नं जाहीर केलेल्या दरांनुसार, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९९,१७० रुपयांना विकलं जात आहे. काल संध्याकाळी १० ग्रॅम सोन्याचा दर ९७१६४ रुपये होता. म्हणजेच आज सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत २००० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम १,०६,२४० रुपयांवर पोहोचली आहे.

७४ दिवसांत १० हजारांची वाढ

सोन्याच्या किंमतीत ७४ दिवसांमध्ये १० हजार रुपयांची तेजी आलीये. यापूर्वी इतक्या दिवसांत सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली नव्हती.

तेजीचं कारण काय?

सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण म्हणजं इस्रायलनं इराणवर केलेला हल्ला. त्यामुळे अरब देशांमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कच्च्या तेलाचे दर १३ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजारातील अस्थिरतेमुळे लोकांचा कल सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागलाय. यासोबतच जगभरातील मध्यवर्ती बँकाही सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे अलिकडच्या काळात सोन्यानं चांगला परतावा दिलाय.

जागतिक स्तरावर तणाव कमी झाला नाही तर सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचा ट्रेंड कायम राहील, असं तज्ज्ञांचं मत आहे. गुंतवणूकदार वेगानं बदलणाऱ्या जागतिक बाजारपेठेवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.

Web Title: gold price 13 june 2025 crosses rs 1 lakh mark prices increase due to Israel Iran conflict air india plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.