lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदर कपातीनंतरही अर्थव्यवस्थेला चालना नाही

व्याजदर कपातीनंतरही अर्थव्यवस्थेला चालना नाही

रेपो रेटचा दर ०.४० टक्के कपातीनंतर आता ४ टक्के झाला आहे तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के व परिणामी मध्यवर्ती व्याजदर ४.२५ झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:06 AM2020-05-23T01:06:46+5:302020-05-23T01:13:52+5:30

रेपो रेटचा दर ०.४० टक्के कपातीनंतर आता ४ टक्के झाला आहे तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के व परिणामी मध्यवर्ती व्याजदर ४.२५ झाला आहे.

Even after interest rate cuts, the economy is not moving | व्याजदर कपातीनंतरही अर्थव्यवस्थेला चालना नाही

व्याजदर कपातीनंतरही अर्थव्यवस्थेला चालना नाही

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शशिकांत दास यांनी व्याजदरात ०.४० टक्क्यांची कपात केल्यानंतरही अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नसल्याने शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकात घसरण बघायला मिळाली.
रेपो रेटचा दर ०.४० टक्के कपातीनंतर आता ४ टक्के झाला आहे तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के व परिणामी मध्यवर्ती व्याजदर ४.२५ झाला आहे. यानंतरही बाजारात निराशेचे वातावरण पसरण्याचे कारण म्हणजे शशिकांत दास यांनी वाढत्या थकीत कर्जासाठी कुठलीही माफी योजना वा पुनर्बांधणी योजना (रिस्ट्रक्चरिंग) जाहीर केलेली नाही हे आहे. बाजारात ही योजना येण्याची आशा होती. भारताचा जीडीपी सध्या २२० लाख कोटी आहे व तो १० टक्क्याने म्हणजे २२ लाख कोटींनी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दास यांनी यावर मौन बाळगल्यानेही बाजारात निराशा पसरली. याबरोबरच खाद्यान्न महागाईचा दर ६ टक्क्यांनी वाढेल. जीडीपी वाढायला आॅक्टोबरनंतर सुरुवात होऊ शकते. ही भाकितेही निराशाजनक ठरली. त्यामुळेच सर्व कर्जांना मिळालेली तीन महिने मुदतवाढ, वसुलीला एक वर्ष स्थगिती या घोषणाही बाजारातील घसरण थांबवू शकल्या नाहीत.
दास यांची एकमेव सकारात्मक घोषणा म्हणजे विदेशी मुद्रा भांडार ९.२० अब्ज डॉलरने वाढून ४८७ अब्ज डॉलर झाले ही आहे. यातून एक वर्षाची आयात भागवता येईल, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.

निराशेचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे २०२०-२१ या चालू वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी)
दरवाढ उणे (निगेटिव्ह) राहील हे दास यांचे भाकीत. हे करताना जीडीपी किती कमी होईल हे दास यांनी सांगितले नाही.

Web Title: Even after interest rate cuts, the economy is not moving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.