lokmat Supervote 2024
Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:46 PM2022-09-19T19:46:39+5:302022-09-19T19:47:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे.

Bitcoin hits, price drops below $19,000, Ether hits 2-month low CoinGecko business crypto news | Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. बिटकॉइन, जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, सोमवारी 6 टक्क्यांनी घसरून 18,830 डॉलर्सवर व्यापार करत होती. तसेच, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप गेल्या 24 तासात 4 टक्क्यांनी घसरून 1 ट्रिलियन डॉलर्सच्या खाली आले आहे. CoinGecko च्या म्हणण्यानुसार, सोमवारपर्यंत एकूण जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 974 बिलियन डॉलर्सवर व्यापार करत होता.

बिटकॉइन व्यतिरिक्त, इथेरियम ब्लॉकचेनच्या इथर, दुसरी सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील सोमवारी जोरदार घसरण झाली. इथर सोमवारी 10 टक्क्यांनी घसरून खाली 1,370 डॉलर्सवर व्यापार करत होता. क्रिप्टोकरन्सीची किंमत अलीकडच्या काही दिवसांत इथेरियममधील प्रमुख सॉफ्टवेअर सुधारणांमुळे कमी होत असल्याचे दिसून आले आहे. जूनच्या मध्यात इथरच्या किमतीत वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इथरियम ब्लॉकचेनचे अपग्रेडेशन हे होते.

Dogecoin आणि ShibaInu च्या किमतीत घसरण
Dogecoin सारख्या इतर अनेक क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत सोमवारी घसरण दिसून आली. डॉगकॉईन 7 टक्क्यांच्या घसरणीसह 0.05 डॉलर्सवर व्यापार करत होती. दुसरीकडे, शिबा इनू सोमवारी 9 टक्क्यांच्या घसरणीसह 0.0000011 डॉलर्सवर व्यापार करत होती. दुसरीकडे एक्सआरपी, सोलोना, पोलकाडॉट, टीथर, लिटकॉइन, चेनलिंक, एपिकॉन आणि स्टेलरसारख्या क्रिप्टोकरन्सीमध्येही मोठी घसरण दिसून आली.

Web Title: Bitcoin hits, price drops below $19,000, Ether hits 2-month low CoinGecko business crypto news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.