lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Diwali Bonus : केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर! जाणून घ्या, कुणाला होणार फायदा, कुणाला नाही

Diwali Bonus : केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर! जाणून घ्या, कुणाला होणार फायदा, कुणाला नाही

यापूर्वी, रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठीही या श्रेणीतील बोनस जाहीर करण्यात आला होता. अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या व्यय विभागाने मंगळवारी एका निवेदनातून ही घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:16 PM2021-10-20T17:16:48+5:302021-10-20T17:18:10+5:30

यापूर्वी, रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठीही या श्रेणीतील बोनस जाहीर करण्यात आला होता. अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या व्यय विभागाने मंगळवारी एका निवेदनातून ही घोषणा केली.

Center govt employees Diwali bonus non productivity linked bonus announced | Diwali Bonus : केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर! जाणून घ्या, कुणाला होणार फायदा, कुणाला नाही

Diwali Bonus : केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर! जाणून घ्या, कुणाला होणार फायदा, कुणाला नाही

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Center govt employee) आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसची (Non-productivity linked bonus) घोषणा केली आहे. यापूर्वी, रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठीही या श्रेणीतील बोनस जाहीर करण्यात आला होता. अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या व्यय विभागाने मंगळवारी एका निवेदनातून ही घोषणा केली. हा बोनस केंद्र सरकारच्या ग्रुप सी आणि ग्रुप बी मधील, अ-राजपत्रित कर्मचाऱ्यांना उपलब्ध असेल, जे कुठल्याही प्रोडक्टिव्हिटी-लिंक्ड बोनस अंतर्गत येत नाहीत. (Diwali bonus)

या लोकांना होणार फायदा -
- व्यय विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनसअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. म्हणजेच, नॉन-प्रोडक्टिव्हिटीशी संबंधित बोनस ग्रुप-सी आणि ग्रुप-बीच्या सर्व अराजपत्रित कर्मचाऱ्यांना मिळेल, जे कुठल्याही प्रोडक्टिव्हिटीशी लिंक्ड बोनसअंतर्गत येत नाहीत.

- केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलाचे कर्मचारीही या बोनससाठी पात्र असतील. जे कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत सेवेत होते आणि ज्यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात किमान सहा महिने सलग सेवा दिली आहे, तेही या बोनससाठी पात्र असतील, असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे.

- ज्या कर्मचाऱ्यांनी 31 मार्च 2021 पूर्वी राजीनामा दिला, सेवानिवृत्त झाले अथवा त्यांची सेवा संपुष्टात आली त्यांच्या बाबतीत, हा बोनस केवळ वैद्यकीय आधारावर सेवानिवृत्त झालेल्या किंवा 31 मार्च 2021 पूर्वी मरण पावलेल्यांना दिला जाईल. परंतु या प्रकरणांमध्येही, वर्षभरात किमान सहा महिने नियमित सेवा असणे आवश्यक आहे.

Read in English

Web Title: Center govt employees Diwali bonus non productivity linked bonus announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.