lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Taxpayers साठी मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविली; आता पाहा शेवटची तारीख कोणती?

Taxpayers साठी मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविली; आता पाहा शेवटची तारीख कोणती?

Income Tax Return: ज्या करदात्यांना अद्याप वित्त वर्ष 2020-21 (FY21) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2021-22 (AY22)साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरता (ITR Filing) आले नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, असे सीबीडीटीने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:12 PM2021-05-20T21:12:48+5:302021-05-20T21:20:40+5:30

Income Tax Return: ज्या करदात्यांना अद्याप वित्त वर्ष 2020-21 (FY21) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2021-22 (AY22)साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरता (ITR Filing) आले नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, असे सीबीडीटीने म्हटले आहे.

cbdt extended itr filing deadline for fy 2020-21 if you did not filed income tax return till now then check new dates | Taxpayers साठी मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविली; आता पाहा शेवटची तारीख कोणती?

Taxpayers साठी मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविली; आता पाहा शेवटची तारीख कोणती?

Highlightsसीबीडीटीने 2021 आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती पाहात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. (cbdt extended itr filing deadline for fy 2020-21 if you did not filed income tax return till now then check new dates)

ज्या करदात्यांना अद्याप वित्त वर्ष 2020-21 (FY21) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2021-22 (AY22)साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरता (ITR Filing) आले नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, असे सीबीडीटीने म्हटले आहे.

दरम्यान, सीबीडीटीने 2021 आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविली आहे. याआधी  31 जुलै 2021 पर्यंत ही अंतिम मुदत होती. 

>> सीबीडीटीने टॅक्स ऑडिट अॅसेसीसाठी (Tax Audit Assessee) आयटीआर भरण्याचा करण्याचा कालावधी  30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविला आहे.

>> सीबीडीटीने टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठी डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 वरून 31 ऑक्टोबर 2021 केली आहे.

>> सीबीडीटीने बिलेटेड/सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी (ITR) मुदत वाढविण्यात आली. ही 31 डिसेंबर 2021 हून वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.

>> याचबरोबर, प्रायसिंग स्टडी रिपोर्टला ट्रान्सफर करण्यासाठी डेललाईन आता 30 नोव्हेंबर 2021 करण्यात आली आहे.

>> एसएफटीचा कालावधी 31 मे 2021 वरून 31 जून 2021 करण्यात आली आहे.

>> रिपोर्टेबल अकाऊंट स्टेटमेंट देण्याची शेवटची तारीख 31 मेच्या ऐवजी 30 जून 2021 करण्यात आली आहे.

>> आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच मार्च 2021 तिमाहीसाठी टीडीएस स्टेटमेट जमा करण्याची डेडलाइन 31 मे 2021 वरून 31 जून 2021 करण्यात आली आहे.

>> सीबीडीटीने कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म-16 जारी करण्याचा कालावधी देखिल वाढवला आहे. आता ही तारीख 15 जून 2021 च्याऐवजी 15 जुलै 2021 केली आहे.

Web Title: cbdt extended itr filing deadline for fy 2020-21 if you did not filed income tax return till now then check new dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.