lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्योगजगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत; उपायांची तातडीने अंमलबजावणी हवी

उद्योगजगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत; उपायांची तातडीने अंमलबजावणी हवी

बिकट स्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी देशातील जनता करत होती. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या हाती खूपच कमी कालावधी आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 07:54 AM2020-02-02T07:54:40+5:302020-02-02T07:55:08+5:30

बिकट स्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी देशातील जनता करत होती. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या हाती खूपच कमी कालावधी आहे

budget 2020 : Industry welcomes budget; The measures should be implemented immediately | उद्योगजगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत; उपायांची तातडीने अंमलबजावणी हवी

उद्योगजगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत; उपायांची तातडीने अंमलबजावणी हवी

नवी दिल्ली : अर्थसंकल्पातील सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्योगजगताने व्यक्त केली आहे.
आरपीजी एंटरप्राईजेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका म्हणाले की, वातावरणातही निर्मला सीतारामन यांनी दूरदृष्टीने विचार करून अर्थसंकल्प तयार केला आहे. बिकट स्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी देशातील जनता करत होती. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या हाती खूपच कमी कालावधी आहे.
बायकॉनच्या सीएमडी किरण मजुमदार शॉ म्हणाल्या की, कंपनी कायद्यात दुरुस्ती करून कंपन्यांना होणारा त्रास कमी करण्याचे वित्तमंत्र्यांनी दिलेले आश्वासन लाभदायक ठरेल.
महिंद्र अँड महिंद्रचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी सांगितले की, दर्जा उंचावणे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढविणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे अशी अनेक पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी.

Web Title: budget 2020 : Industry welcomes budget; The measures should be implemented immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.