lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळेल 10 लाख रुपयांचे कर्ज; काय आहे मुद्रा लोन योजना? पाहा...

कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळेल 10 लाख रुपयांचे कर्ज; काय आहे मुद्रा लोन योजना? पाहा...

Mudra Loan Yojana: भाजपने आपल्या जाहीरनाम्यात या योजनेतील रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:16 PM2024-04-15T15:16:01+5:302024-04-15T15:16:14+5:30

Mudra Loan Yojana: भाजपने आपल्या जाहीरनाम्यात या योजनेतील रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे.

Mudra Loan Yojana: Get a loan of Rs 10 lakh without any guarantee; What is Mudra Loan Scheme? see | कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळेल 10 लाख रुपयांचे कर्ज; काय आहे मुद्रा लोन योजना? पाहा...

कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळेल 10 लाख रुपयांचे कर्ज; काय आहे मुद्रा लोन योजना? पाहा...

Mudra Loan Yojana: कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते थेट पैसे गुंतवून व्यवसाय सुरू करतात. पण, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशा लोकांसाठी केंद्र सरकारने खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर कुठलाही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. सध्या या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते, जे 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, ती मुद्रा लोन योजना ( Pradhan Mantri Mudra Yojana) आहे. देशातील मध्यमवर्गीयांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही गॅरंटीशिवाय दिले जाते. आता भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेतील रक्कम 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत आतापर्यंत लाखो लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. 

या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण, अशा तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या श्रेणीत 50 हजारापर्यंतचे कर्ज दिले जाते. दुसऱ्या श्रेणीत 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तर, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. कर्ज घेण्यासाठी अर्जासोबत तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, हे सांगावे लागते. 

कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देतात. हा व्याजदर 10 टक्के ते 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. अर्जासोबत दिलेल्या सर्व कागदपत्रांची बँकेकडून छाननी केली जाते आणि त्यानंतर सर्वकाही ठीक असल्यास मुद्रा कार्ड जारी केले जाते. हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे, ज्याद्वारे तुम्ही व्यवसायासाठी आवश्यक असेल तेव्हा पैसे देऊ शकता.

Web Title: Mudra Loan Yojana: Get a loan of Rs 10 lakh without any guarantee; What is Mudra Loan Scheme? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.