lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > पंजाब नॅशनल बँकेत अकाऊंट असेल तर १८ डिसेंबरपर्यंत करा 'हे' काम, अन्यथा बंद होईल खातं

पंजाब नॅशनल बँकेत अकाऊंट असेल तर १८ डिसेंबरपर्यंत करा 'हे' काम, अन्यथा बंद होईल खातं

तुमचं सरकारी क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खातं असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:41 AM2023-12-08T09:41:22+5:302023-12-08T09:41:46+5:30

तुमचं सरकारी क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खातं असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

If you have an account with Punjab National Bank do kyc by December 18 2023 otherwise the account will be closed | पंजाब नॅशनल बँकेत अकाऊंट असेल तर १८ डिसेंबरपर्यंत करा 'हे' काम, अन्यथा बंद होईल खातं

पंजाब नॅशनल बँकेत अकाऊंट असेल तर १८ डिसेंबरपर्यंत करा 'हे' काम, अन्यथा बंद होईल खातं

तुमचं सरकारी क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खातं असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला १८ डिसेंबरपर्यंत महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे. असं न झाल्यास तुमचं बँक खाते बंद होऊ शकतं. वास्तविक, तुम्हाला तुमचे केवायसी अपडेट करावे लागेल. पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांना १८ डिसेंबर २०२३ पर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्यास सांगितलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे.

केवायसी अपडेट करणं आवश्यक
खात्याचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी खातेधारकांनी त्यांचं केवायसी अपडेट केलं पाहिजे. ही सूचना त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांच्या बँक खात्यातील केवायसी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अपडेट केलं गेलं नव्हतं, असं पीएनबीनं म्हटलंय.

बँक ब्रान्चमध्ये द्या माहिती
ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, नवा फोटो, पॅन, मोबाइल नंबर किंवा अन्य कोणती केवायसी आपल्या बँक ब्रान्चला द्या. हे पीएनबी वन, इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेस, रजिस्टर इमेल/पोस्ट किंवा कोणत्याही ब्रान्चमधून १८ डिसेंबरपर्यंत वैयक्तिक रित्या जाऊन करता येईल असं त्यांनी नमूद केलंय.

बंद होईल अकाऊंट
१८ डिसेंबरपर्यंत आपलं केवायसी केलं नाही तर, तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही नजीकच्या पीएनबीच्या शाखेला भेट देऊ शकता किंवा https://www.pnbindia.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Web Title: If you have an account with Punjab National Bank do kyc by December 18 2023 otherwise the account will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.