lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > Bank Holiday, Strike: दोन दिवसांचा संप! झटपट कामे उरका, बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार...

Bank Holiday, Strike: दोन दिवसांचा संप! झटपट कामे उरका, बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार...

युएफबीयूने १३ जानेवारीलाच संपाची घोषणा केली होती. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्राद्वारे पाठवल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 02:27 PM2023-01-26T14:27:45+5:302023-01-26T14:28:46+5:30

युएफबीयूने १३ जानेवारीलाच संपाची घोषणा केली होती. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्राद्वारे पाठवल्या आहेत.

Bank Holiday, Strike: Two-day strike! Get things done quickly, banks will be closed for four days before budget... | Bank Holiday, Strike: दोन दिवसांचा संप! झटपट कामे उरका, बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार...

Bank Holiday, Strike: दोन दिवसांचा संप! झटपट कामे उरका, बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार...

१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यापूर्वीच चार दिवस बँकेचे काम ठप्प राहणार आहे. बँकांना सुट्टी नाहीय, परंतू बँकांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन(UFBU) ने ३० आणि ३१ जानेवारीला संपाची घोषणा केली आहे. याशिवाय चौथा शनिवार आणि रविवार असल्याने सलग चार दिवस बँका बंद असणार आहेत. 

यामुळे जर तुमची काही कामे असतील तर ती करण्यासाठी उद्या तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे. बँकेचे कोणतेही काम असेल तर ते तुम्हाला उद्याच म्हणजे २७ जानेवारीलाच करावे लागणार आहे. 
सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने दबाव आणण्यासाठी आता कर्मचारी ३० जानेवारीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. युएफबीयूने १३ जानेवारीलाच संपाची घोषणा केली होती. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्राद्वारे पाठवल्या आहेत. मात्र यावर बँक असोसिएशनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता कर्मचाऱ्यांसमोर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जाणे हाच मार्ग उरला आहे.

एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. बँकिंगचे काम आठवड्याचे ५ दिवस करावे, अशी बँक युनियनची मागणी आहे. पेन्शनही अपडेट करणे, एनपीएस रद्द करणे, पगारवाढीसाठीही चर्चा करणे आणि सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Bank Holiday, Strike: Two-day strike! Get things done quickly, banks will be closed for four days before budget...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.