lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Made in India 5G: आता भारताकडे असेल स्वदेशी 5G; TATA समुहासोबत मिळून Airtel ची मोठी घोषणा

Made in India 5G: आता भारताकडे असेल स्वदेशी 5G; TATA समुहासोबत मिळून Airtel ची मोठी घोषणा

5G In India : Airtel आणि TATA समुहानं यासाठी भागीदारी केली आहे. जानेवारी २०२२ पासून एअरटेल या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची शक्यता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:53 PM2021-06-21T18:53:15+5:302021-06-21T18:55:47+5:30

5G In India : Airtel आणि TATA समुहानं यासाठी भागीदारी केली आहे. जानेवारी २०२२ पासून एअरटेल या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची शक्यता. 

Airtel and Tata Group joins hands for 5G rollout made in india technology | Made in India 5G: आता भारताकडे असेल स्वदेशी 5G; TATA समुहासोबत मिळून Airtel ची मोठी घोषणा

Made in India 5G: आता भारताकडे असेल स्वदेशी 5G; TATA समुहासोबत मिळून Airtel ची मोठी घोषणा

HighlightsAirtel आणि TATA समुहानं यासाठी भागीदारी केली आहे. जानेवारी २०२२ पासून एअरटेल या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची शक्यता. 

Made in India 5G: भारतासाठी 5G नेटवर्क सोल्युशन्स (5G Networks Solutions) भारतातच तयार केली जातील अशी घोषणा भारती एअरटेल (Bharati Airtel) आणि टाटा समुहानं (Tata Group) केली. त्यामुळे आता देशात स्वदेशीच 5G नेटवर्क असणार आहे. टाटा समुहानं ओ-आरएएन (O-RAN) आधारित रेडिओ आणि एनएसए/एसए कोअर अत्याधुनिक विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान २०२२ पासून कमर्शिअल वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

जानेवारी २०२२ पासून एअरटेल टाटा समुहाच्या या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात आपली 5G सेवा सुरू करू शकणार आहे. सुरूवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू होईल आणि भारत सरकारद्वारे देण्यात आलेल्या गाईडलाईन्सचही पालन करण्यात येईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 3GPP आणि O-RAN दोन्ही मानकांच्या एन्ड टू एन्ड सोल्युशनसाठी मदत करते. 

"भारताला 5G आणि संबंधित तंत्रज्ञानाचे जागतिक हब तयार करण्यासाठी टाटा समुहासोबत एकत्र येऊन आम्हाला आनंद होत आहे. आपल्या जागतिक तंत्रज्ञानासोबत जगासाठी अत्याधुनिक सोल्यूशन्स आणि अनुप्रयोग तयार करण्यासाठी भारत योग्य स्थितीत आहे. यामुळे भारताला एक इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन बनण्यासाठी मदत मिळेल," असं मत भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी सांगितलं.

Web Title: Airtel and Tata Group joins hands for 5G rollout made in india technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.